शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फार्महाऊसवरील ‘डान्स पार्टी’मधील अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:10 IST

पुणे : राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून बारगर्ल आणत त्यांच्यासोबत फार्महाऊसवर डान्स पार्टीची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. ...

पुणे : राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून बारगर्ल आणत त्यांच्यासोबत फार्महाऊसवर डान्स पार्टीची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. या पार्टीचे आयोजन करून बाराबालांसोबत थिरकणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच पार्टीतील सहभागी ठेकेदारांनी केलेल्या कामांची गुणवत्ता तसेच प्रत्यक्षात कामे झाली आहेत की नाही याची दक्षता समितीमार्फत बारकाईने तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

कुडजे गावातील लबडे फार्महाऊसवर पालिकेतील ‘रिंग मास्टर’ ठेकेदार आणि एक अधिकारी पोलिसांच्या छाप्यात पकडले गेले. पोलिसांनी मंगेश राजेंद्र शहाणे (वय ३२, रा. संतनगर, अरण्येश्वर), ध्वनीत समीर राजपूत (वय २५), निखिल सुनील पवार (वय ३३, रा. पर्वती दर्शन), समीर ऊर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय ३९, रा. आगळंबे फाटा, कुडे गाव, ता. हवेली), विवेकानंद विष्णु बडे (वय ४२, रा. नवी सांगवी), प्राजक्ता मुकुंद जाधव (वय २६, रा. मिलिंदनगर, सांताक्रुझ, मुंबई), नीलेश उत्तमराव बोधले (वय २९, दोघेही रा. पुरंदर हाऊसिंग सासोयटी, म्हाडा कॉलनी), सुजित किरण आंबवले (वय ३४, रा. बालाजीनगर) आणि आदित्य संजय मदने (वय २४, रा. अंधेरी पुर्व, मुंबई) यांना अटक केली. तर, फार्म हाऊस व्यवस्थापक पायगुडे, पार्टीचे आयोजन करणारा अधिकारी विवेकानंद बडे आणि डान्सर मुलींना घेऊन येणारी प्राजक्ता जाधव यांना न्यायालयाने ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींची जामीनावर सुटका केली आहे.

अटक झालेल्यांपैकी बहुतांश जण हे पुणे महापालिकेतील ठेकेदार आहेत. यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, विवेकानंद बडे हा पालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता आहे. या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. बडे आणि ठेकेदारांमध्ये नेमके काय संबंध आहेत, त्यांनी ठेकेदारांची बिले देण्यास मदत केली आहे काय याचीही चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.

----

अभियंता विनायक बडे याला निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार गंभीर आहे. पकडले गेलेले ठेकेदार आणि बडे यांच्यातील संबंध नेमके काय आहेत हे तपासण्यात येणार आहे. बडे याची विभागीय चौकशी केली जाणार आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामांची देखील तपासणी केली जाणार आहे. ही कामे खरोखरीच झाली आहेत का, झालेल्या कामांची तपासणी कोणी केली होती, कोणत्या अधिकाऱ्यांनी सह्या दिल्या होत्या हे सर्व बारकाईने तपासले जाणार आहे.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका