शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी राजकीय आरक्षण न मिळाल्यास निवडणुका रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST

पुणे : राज्य शासनाने वेळेत कागदपत्र आणि माहिती न्यायालयात सादर केल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. न्यायालयाने वारंवार संधी ...

पुणे : राज्य शासनाने वेळेत कागदपत्र आणि माहिती न्यायालयात सादर केल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. न्यायालयाने वारंवार संधी देऊनही वेळकाढूपणा केला. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नसल्याचा इशारा भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी दिला. येत्या २६ जून रोजी राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येणार आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या विषयावर पत्रकार परिषद घेत राज्य शासनावर हल्ला चढवला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, की राज्य सरकारला आम्ही भरपूर वेळ दिला आहे. मात्र, आता वेळ द्यायची आवश्यकता नाही. तीनही पक्ष केवळ सरकार टिकविण्याची धडपड करीत असून जनहिताचे निर्णय घेतले जात नाहीत. न्यायालयाने वेळ देऊनही माहिती सादर करण्यात न आल्याने न्यायालयाने ताशेरे ओढले. सरकारने लवकरात लवकर ‘इम्पिरिकल डाटा’ गोळा करावा. त्यासाठी राज्य मागास आयोगामार्फत जिल्हानिहाय टास्क फोर्स तयार करावा. अन्यथा, न्यायालयात याचिका दाखल करून निवडणुका होऊ देणार नसल्याची आमची ठाम भूमिका असल्याचे त्या म्हणाल्या.

----

रस्त्यावर उतरणार

येत्या २६ जून रोजी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरणार असून त्याकरिता बहुजन आरक्षणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस निवडला आहे. महाराष्ट्रभर आणि तालुकास्तरापर्यंत आंदोलन करणार असून भाजप ओबीसींच्या बाजूने उभी असल्याचे मुंडे म्हणाल्या.

----

सरकारमधील मंत्रीच आंदोलन करीत आहेत. निर्णय घेण्याचे अधिकार असताना आंदोलन का करताय, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारचे केंद्राकडे बोट दाखविणे चूक आहे. जनगणनेशी या विषयाचा संबंध नाही. न्यायालयाने ‘इम्पिरिकल डाटा’च्या आधारावर रिपोर्ट सादर करावा, असे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये जनगणना हा शब्द नाही. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा राज्याशी संबंधित विषय आहे. शासनाने ठोस भूमिका घ्यावी.

- पंकजा मुंडे, राष्ट्रीय चिटणीस, भाजप