शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातील तांदळाचा अपहार

By admin | Updated: October 11, 2016 02:14 IST

पुणे महापालिकेचा शालेय पोषण योजनेतील विद्यार्थ्यांसाठी वितरीत करण्यात येणारा तांदूळ बेकायदेशीररीत्या विक्रीप्रकरणी खडक

पुणे : पुणे महापालिकेचा शालेय पोषण योजनेतील विद्यार्थ्यांसाठी वितरीत करण्यात येणारा तांदूळ बेकायदेशीररीत्या विक्रीप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मंगलाराम नारायणराम सिरवी (वय ३०, रा. नंदनवन सोसायटी, हांडेवाडी चौक, हडपसर. मूळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि मांगीलाल समेलारामजी देवासी (वय ३४, रा. अण्णा कवडे चाळ, घोरपडी गाव, मूळ रा. राजस्थान) अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शालेय पोषण आहारचे अधीक्षक मदन भागवत हगवणे (वय ४३, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील अरुणा पुरुषोत्तम सापा, हाजरा रफिक अन्सारी, वर्षा भारत सोनवणे, शमिम इस्माईल मुंगळे (चौघही रा. भवानीपेठ) आणि रामलाल चौधरी (रा़ कोंढवा) यांचा पोलीस शोध घेत आहेत. शालेय पोषण आहार योजनेतील विद्यार्थ्यांसाठी आहार बनविण्यासाठी तांदळाचा पुरवठा केला जातो़ पुरवठा केलेल्या या तांदळापैकी १ हजार १५५ किलो वजनाच्या २४ बॅगा घेऊन टेम्पो मार्केटमध्ये बेकायदेशीररीत्या विकण्यासाठी २४ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता चालला होता़ हा टेम्पो पकडण्यात आला़ टेम्पोचालक वैभव जाधव याला याबाबत विचारणा केल्यावर, त्याने हा तांदूळ भवानीपेठ येथील झोपडपट्टीमध्ये भरला असल्याचे सांगितले़ खडक पोलिसांनी टेम्पोसह तांदूळ जप्त केला़ पोलीस कोठडीत रवानगी४जप्त करण्यात आलेला तांदूळ शासकीय योजनेतील असून, तो महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी त्याचा आहार बनवून त्याचे वाटप करण्याकरिता महिला बचत गटांकडे देण्यात आला होता़ आरोपींनी संगनमत करून, स्वत:च्या फायद्यासाठी रामलाल चौधरी याच्या मार्फत विकला. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून बॅगा जप्त करायच्या आहेत. त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. भोसले यांनी दोघांना १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.