शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी वाढले; बारावीचे घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:12 IST

इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट असले तरी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे जाहीर ...

इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट असले तरी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले आहे. मागील वर्षी दहावी-बारावीचा निकाल चांगलाच वाढला होता. परंतु, कोरोनामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इयत्ता बारावीतील काही विद्यार्थ्यांनी परी‌क्षा न देण्याचा निर्णय घेतला असावा, असे बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

पुणे विभागीय मंडळांतर्गत पुणे, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी करतात. यंदा दहावीच्या २ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या २ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी या तीनही जिल्ह्यांमधून परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

------

दहावीचे परीक्षार्थी

२०२० : २,५८,२०४

२०२१ : २,७१,५०३

------------

बारावीचे परीक्षार्थी

२०२० : २,४१,८१५

२०२१ : २,३०,९८३

--------------------

१) दहावीची परीक्षा - २९ एप्रिल ते २० मे

२) बारावीची परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे

-------

१) वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, या उद्देशाने मराठवाडा व विदर्भातील काही विद्यार्थी पुणे विभागांतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता बारावीला प्रवेश घेत होते. परंतु, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र अशी कोणतीही मर्यादा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राहणार नाही, असे राज्य शासनाने जाहीर केले. त्यामुळे यंदा पुणे विभागातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असावी.

२) विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात महाराष्ट्रातील सर्वच भागांतून इयत्ता बारावीचा अभ्यास करण्यासाठी अनेक विद्यार्थी येतात. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणीमुळे पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली असल्याचे बोलले जात आहे.