शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य पुणे महापालिका

By admin | Updated: October 19, 2014 22:57 IST

गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे लोकसभेपाठोपाठ भाजपाला शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत मताधिक्य मिळाले आहे.

पुणे : गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे लोकसभेपाठोपाठ भाजपाला शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांनंतर होणाऱ्या महापालिकेतील निवडणुकीमध्ये पक्षाचा महापौर करण्याचे लक्ष भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविल्याची चर्चा आहे.पुणे शहरात शिवसेनेबरोबर भाजपने १९९० ला पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत युती केली. त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीचे सत्ता आली. त्या वेळी पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी ३ ठिकाणी शिवसेना व दोन जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतरच्या १९९७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपला अंंदाजे २० जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर पुन्हा १९९९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन जागा कायम राहून शिवसेनेची तीनपैकी एक जागा कमी झाली. त्यानंतर २००२ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे ३५ नगरसेवक निवडून आले. पण, हळूहळू शिवसेनेची ताकद कमी होत गेली. दरम्यान, एका बाजूला भाजपची संघटनात्मक ताकद वाढत असताना शिवसेनेची ताकद कमी होत गेली. २००४ विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागा कमी होऊन केवळ गिरीश बापट व विनायक निम्हण हे दोघेच निवडून आले. त्यानंतर शिवसेनेतून फुटून मनसे या वेगळ्या राजकीय पक्षाची स्थापन राज ठाकरे यांनी केली. त्यामुळे शहरातील युतीमध्ये भाजपाचे वजन वाढले. २००९ मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर सहाचे आठ मतदारसंघ झाले. त्या वेळी भाजपाचे शहरातून कसबा व पर्वती असे दोन आणि पोटनिवडणुकीतून खडकवासला एक असे तीन आमदार होते. २०१२च्या निवडणुकीतही शिवसेनेचे २० वरून १५ नगरसेवक झाल्यानंतरही भाजपचे २५ चे २६ नगरसेवक निवडून आले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले. त्या वेळेपासून देशभर मोदी नावाची लाट सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत देशभर भाजपला २८२ जागा मिळवून एकहाती सत्ता मिळाली. शहरातील आठही मतदारसंघांत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामुळे मोदींची लाट पुणे शहरात पुन्हा एकदा चालल्याचे चर्चा आहे. लोकसभा व विधानसभेत शहरातील सर्व मतदारसंघात निर्विवाद प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीवर भाजपा लक्ष केंद्रित करणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ सुत्राने सांगितले. (प्रतिनिधी)