शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगावात आता प्रचाराची रणनीती

By admin | Updated: February 13, 2017 01:26 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक चुरशीने लढली जाणार असून आंबेगाव तालुक्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

मंचर : जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक चुरशीने लढली जाणार असून आंबेगाव तालुक्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून नेत्यांना आणण्याची रणनीती आखण्यात आली आहे. शिवसेना, भाजपाकडून राज्यातील विद्यमान मंत्र्यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँगे्रसकडून माजी मंत्र्यांना प्रचारासाठी आाणण्याची तयारी करण्यात आली आहे.विशेषत: राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेना या दोन पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत असेल. विजयी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सर्वच पक्ष करणार आहेत. प्रचारात त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जाणार आहेत. प्रचारात नेत्यांच्या सभा आयोजित करून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न राहणार आहे. तालुक्यात माघारीपूर्वीच प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे. शिवसेनेने पेठ येथे उपनेते नितीन बानगुडे यांची सभा घेतली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रचारदौरे करणार असून प्रत्येक तालुक्यात त्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.शिवसेना राज्यात सत्तेवर असल्याने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पााटील, मंत्री विजय शिवतारे तसेच विश्वव्याख्याते शिवरत्न तोटे यांच्या प्रचाराच्या सभा घेणार आहे. भाजपाला तालुक्यात या निवडणुकीत ताकद दाखवायची आहे, म्हणून त्यांनी पेठ, मंचर, डिंभे भागात मंत्र्यांची सभा घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पाालकमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, तसेच मंत्री विष्णू सावरा यांच्या सभेचे नियोजन करण्यात येत असल्याचे तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचाराची धुरा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे असून ते स्वत: ठिकठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. मात्र शक्य झाल्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा घेण्याचा प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी सांगितले.