शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाच्या नोटिशीस केराची टोपली

By admin | Updated: May 16, 2017 06:46 IST

पुणे महापालिकेला दिलेली जमीन पालिकेने परस्पर ‘सी डॅक’ला भाडेतत्त्वावर दिली असून त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने महापालिकेला नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महापालिकेला दिलेली जमीन पालिकेने परस्पर ‘सी डॅक’ला भाडेतत्त्वावर दिली असून त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. मात्र, या नोटिशीची मुदत संपल्यानंतरही पालिकेने कोणतेही उत्तर दिलेले नाही. नोटिशीला केराची टोपली मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारीतील येरवड्यातील सरकारी जमीन १९९२मध्ये महापालिकेला देण्यात आली होती. पालिकेने कोणतीही परवानगी न घेता ही जागा सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटिंग (सी-डॅक) या संस्थेला भाडेतत्त्वाने दिली. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने महापालिकेला नोटीस बजावून ८ दिवसांत उत्तर द्यावे, अशी सूचना केली होती. परंतु, ८ दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही पालिकेकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. सरकारी जमीन दिल्यानंतर तिचा वापर भाडेतत्त्वावर करता येत नाही. पालिकेने या संदर्भात कोणतीही परवानगी न घेता सी-डॅकला जागा भाडेतत्त्वाने दिली. त्यामुळे करारभंग झाला असून, पालिकेला नोटीस बजावण्यात आली. पालिकेकडून कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याचे महसूल विभागाचे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी सांगितले.