शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे जगतापच्या शेतकऱ्यांना गॅस पाइपलाइनसाठी नोटिसा

By admin | Updated: August 20, 2016 05:13 IST

पिंपळे जगताप, वाजेवाडी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांना भारत सरकारच्या पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी उरण ते चाकण-शिक्रापूरमार्गे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन

केंदूर : पिंपळे जगताप, वाजेवाडी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांना भारत सरकारच्या पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी उरण ते चाकण-शिक्रापूरमार्गे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे जमिनीतून पाइपलाइन घालणे आवश्यक आहे. त्यासाठी पेट्रोलियम व मिनरल पाइपलाइन अशा दोन लाइनसाठी जमीनवापराचा हक्क संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. चाकण-शिक्रापूर रोडच्या उजव्या बाजूने काही वर्षांपूर्वी रिलायन्स गॅस पाइपलाइनही टाकण्यात आलेली आहे. या नोटिशीमध्ये पाइपलाइन जमिनीखालून चार फूट, रेल्वे वगैरे आहे , त्या ठिकाणी आठ फूट व नदीच्या ठिकाणी १६ फूट खोलीतून जाणार आहे. पाइपलाइनचा आकार १२ इंच तर ज्या ठिकाणी उपलाइन होणार आहे. तेथे आकार १० इंच असणार आहे. पाइपलाइन गेल्यानंतर शेतकऱ्यांना शेती करण्यात येणार असून, लाइनवर घर, विहीर, तळे करता येणार नाही. यासाठी शेतजमिनीचे संपादन करण्यात येणार नसून, पाइपलाइन टाकल्यानंतर मालकही बदलणार नसल्याचा नोटिशीत उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच सदर जमीन वापराच्या हक्काबाबत मोबदला म्हणून जमीनमालकास जमिनीच्या सरकारी किमतीच्या १० टक्के रक्कम मोबदला म्हणून देण्यात येणार आहे. जवळूनच गेलेल्या गॅसलाइनच्या वेळी तेथील शेतकऱ्यांची फसवणूक झालेली होती. तशी पुन्हा आमची होऊ नये; अन्यथा यास आम्ही विरोध करू, असे बाधित शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)