शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

चैतन्य स्कूलला शिक्षण विभागाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST

वाघोली : शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी व पालकांकडून शाळेची यावर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्‍ती करू ...

वाघोली : शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी व पालकांकडून शाळेची यावर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्‍ती करू नये, असे आदेश दिले असताना फी भरली नाही किंवा इतर काही कारणांमुळे मुलांचे ऑनलाइन शिक्षण थांबवण्याचा प्रकार वाघोली येथील श्री चैतन्य स्कूलच्या व्यवस्थापनाने केला होता. याबाबत पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप सातव यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार उपशिक्षणाधिकारी यांनी शाळेची फी भरली नाही म्हणून ऑनलाइन शिक्षण बंद करू नये व यापुढील काळात शिक्षक व पालक संघटनेची कोणतीही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश चैतन्य स्कूल शाळा व्यवस्थापनाला दिला आहे.

शाळेची फी भरली नाही म्हणून ऑनलाइन शिक्षणासाठी लिंक न पाठवणे, ऑनलाइनसाठी आवश्‍यक पासवर्ड न देणे, कोणत्याही प्रकारची फीमध्ये सवलत न देणे, याबाबत पालकांच्या वतीने शिक्षण विभागाकडे स्कूलसंदर्भात अनेक तक्रारी होत्या. लॉकडाऊननंतर विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या परवानगीने ऑनलाइन शिक्षण घेण्याबाबत शिक्षण विभागाने आदेश दिले होते. त्यानुसार ऑनलाइन शिक्षण सुरू झाले होते. मात्र, श्री चैतन्य टेक्‍नो स्कूलच्या विद्यार्थ्यांची फी न भरल्याच्या कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले होते. शिक्षक-पालक संघटनेने स्कूलविरोधात तक्रार केली होती. त्या अनुषंगाने प्राथमिक उपशिक्षणाधिकारी यांनी ऑनलाइन शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. व फीबाबत शिक्षक पालक यांच्याशी समन्वय साधून योग्य ते निर्णय घेण्याबाबत आदेश दिले आहेत. अश्या मुजोरी करणाऱ्या शाळेच्या विरोधात पालकांनी गप्प न राहता शिक्षण विभागाकडे लेखी तक्रारी कराव्यात. अश्या मुजोर शाळेच्या आणखी तक्रारी आल्या तर अश्या शाळेवर कादेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने आदेश दिले आहे.