शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याच्या संदर्भात ७ जणांना नोटिसा

By admin | Updated: June 12, 2016 05:56 IST

येथील रेल्वे कुरकुंभ मोरीतील घाणीच्या संदर्भात ७ जणांना नोटिसा बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश साधना जाधव यांनी दिले आहेत.

दौंड : येथील रेल्वे कुरकुंभ मोरीतील घाणीच्या संदर्भात ७ जणांना नोटिसा बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश साधना जाधव यांनी दिले आहेत. दरम्यान ५ जुलै २0१६ रोजी नोटीसधारकांना उच्च न्यायालयात हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अजित बलदोटा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र शासन, दौंड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे, तत्कालीन आरोग्य अधिकारी भानुदास भापकर, सोलापूर विभागाचे विभागीय अधिकारी ए. के. दुबे, रेल्वेचे अधिकारी सुमीत कुमार, रेल्वे रुग्णालयाचे डॉ. एन. के. सजीव, सेंट्रल रेल्वेचे आरोग्य अधिकारी डी. एन. जोशी यांना नोटिसा बजावण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. दौंडच्या रेल्वे कुरकुंभ मोरीत सातत्याने गटारीतील सांडपाणी साचलेले असते तेव्हा या सांडपाण्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येते. तर बऱ्याचदा रेल्वे कुरकुंभ मोरीतून जाताना पादचारी, वाहनचालकांना याचा उपद्रव होतो. तसेच पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तेव्हा कुरकुंभ मोरीत पाणी साचले जाते. मात्र या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी होते आणि सांडपाण्याचा आरोग्यावर परिणाम होतो. तेव्हा कुरकुंभ मोरीतील सांडपाणी काढणे ही रेल्वेची जबाबदारी नाही, नगर परिषद म्हणते आमची जबाबदारी नाही, मग नेमके या सांडपाण्याला वाली कोण? असा प्रश्न भेडसावत असल्याने जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने यासंदर्भात अ‍ॅड. अजित बलदोटा यांनी दौंड न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. मात्र हा फौजदारी अर्ज नामंजूर करण्यात आला. याकामी अ‍ॅड. विलास बर्वे, अ‍ॅड. सचिन साने यांनी काम पाहिले होते.(वार्ताहर)उच्च न्यायालयात याचिका दाखलफौजदारी अर्ज नामंजूर झाल्याने यासंदर्भात न्याय मागण्यासाठी अ‍ॅड. अजित बलदोटा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी होऊन वरील व्यक्तींवर नोटिसा काढून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याकामी अ‍ॅड. अविनाश आव्हाड यांनी कामकाज पाहिले.