शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

तुमच्या ‘प्लेट’मधील तूप-लोणी भेसळीचे तर नाही ना?

By admin | Updated: June 27, 2017 07:48 IST

तुम्ही जर डेअरींमधून सुटे तूप आणि लोणी (बटर) खरेदी करीत असाल तर सावधान... तुम्ही हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर आणि हातगाडीवर पावभाजी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तुम्ही जर डेअरींमधून सुटे तूप आणि लोणी (बटर) खरेदी करीत असाल तर सावधान... तुम्ही हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर आणि हातगाडीवर पावभाजी वा अन्य खाद्यपदार्थ खात असाल तर सावधान... कारण तुमच्या प्लेटमध्ये असलेले तूप आणि बटर ‘भेसळी’चे असण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कोंढव्यातील एका कारखान्यावर छापा टाकून बनावट तूप व बटर तयार करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. या ठिकाणी तीन खोल्यांमध्ये भेसळीचा गोरखधंदा सुरू होता. कोंढव्यातील गोकुळनगरमध्ये बनावट तूप तयार केले जात असल्याची माहिती पथकाचे सहायक फौजदार संभाजी भोईटे यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह छापा मारला. या तीन खोल्यांमध्ये मोठमोठ्या पिंपांमध्ये बटर आणि तूप भरून ठेवण्यात आलेले होते. यासोबतच मोठ्या पातेल्यांमध्ये तूप, बटर गरम करण्याचा उद्योगही सुरू होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट तूप होत असल्याचे पाहून पोलीसही अचंबित झाले. तूप, सोयाबीन तेल आणि वनस्पती तूप (डालडा) समप्रमाणात एकत्र करून तुपाची भेसळ केली जात होती, तर दुधाचे क्रीम, पाणी आणि सोयाबीन तेल एकत्र करून त्यापासून बनावट लोणी तयार केले जात होते. या पदार्थांची शहरातील विविध हॉटेल्स आणि डेअरींमध्ये विक्री केली जात होती. या रॅकेटने शहरातील जवळपास सोळा डेअरींमध्ये या मालाची विक्री केली आहे. त्याची यादी पोलिसांच्या हाती लागली असून त्यामध्ये सिंहगड रस्ता, मार्केट यार्ड, कात्रज, कोंढवा, घोरपडी पेठ, भारती विद्यापीठ, नऱ्हे, कर्वेनगर, धायरी येथील डेअरींचा समावेश आहे. आतापर्यंत या टोळीने जवळपास वीस लाखांचे पदार्थ शहरात विकले आहेत. एक वर्षापासून या ठिकाणी बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी केसरसिंग रुपसिंग राजपूत (वय २८), शेरसिंग रामसिंग राजपूत (वय २६), गंगासिंग सुखसिंग राजपूत (वय ३०, सर्व रा. श्री सद्गुरु स्वामी समर्थ बिल्डिंग, गोकुळनगर, कोंढवा) यांना अटक केली आहे. हे सर्व जण दोन वर्षांपासून या ठिकाणी राहून बनावट तूप तपार करीत होते. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई केल्यानंतर शहरात असे भेसळीचे आणखी किती कारखाने असतील, याचा शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वास्तविक अशा व्यवसायांवर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. या टोळीने शहरातील अनेक हॉटेल्स आणि डेअरींमध्ये हा बनावट माल विकला आहे. केवळ २४० रुपये किलोने डेअरीमध्ये तूप विकले जाते. डेअरीमधून हेच बनावट तूप ४०० ते ४५० रुपये दराने ग्राहकांना विकले जात आहे. हॉटेल्समध्ये, स्नॅक्स सेंटरमध्ये रोटी, नान, पावभाजी आदी पदार्थांवर घालण्यात येणारे लोणी (बटर) भेसळीचे नसेलच, याची खात्री देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषत: हातगाडीवर आणि बाहेरील पदार्थ खाताना ग्राहकांच्या प्लेटमधील बटर आणि तूप भेसळीचे नाही ना, याची खात्री करण्याची आवश्यकता आहे. कारण अनेकदा स्वस्तात मिळते म्हणून व्यावसायिक अशा भेसळीच्या पदार्थांवर ग्राहकांना संतुष्ट करतात. चव उत्तम लागत असल्याने ग्राहकांनाही त्याचा संशय येत नाही. मात्र, भेसळीचा हा गोरखधंदा करून व्यावसायिक ग्राहकांच्या आरोग्याशी आणि प्रसंगी जीविताशी खेळ करीत असल्याचे चित्र आहे.