शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट रिक्षा परवाना वाटप नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:11 IST

कॅबमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला असताना, राज्य सरकारने रिक्षा परवाना खुला केला आहे.

पुणे : कॅबमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला असताना, राज्य सरकारने रिक्षा परवाना खुला केला आहे. या निर्णयामुळे शहराच्या वाहतूककोंडीत भरच पडणार असून, या व्यवसायासमोरील अडचणीत आणखी वाढ होईल. त्यामुळे सरसकट सर्वांना परवाना न देता बेरोजगारांना तो देण्यात यावा, त्याबाबतचे निकष ठरवावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी येथे केली.रिक्षाचालकांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) निदर्शने करण्यात आली. रिक्षा परवाना अर्ज आॅनलाइन भरण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच बाहेर ही निदर्शने झाली. डॉ. आढाव म्हणाले, की रिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहन आहे. ते चालवणाºया चालक आणि मालकाला अनेक प्रकारची बंधने आहेत. मागील दाराने आलेल्या कॉल अ कॅबला सरकारने मोकाट सोडले आहे. तर दुसरीकडे एकमेव संरक्षण कवच असलेले रिक्षा परवान्यांवरील नियंत्रणसुद्धा काढून घेतले आहे. आता अमर्याद परवाने वाटप करून रिक्षा व्यवसाय आणखी अडचणीत येणार आहे.परवाना वाटप करताना लोकसंख्या, रस्ते, सध्याची उपलब्ध वाहन सुविधा यानुसार नवीन परवाना वाटपाचे सूत्र ठरविले गेले पाहिजे. अन्यथा त्यामुळे शहराच्या वाहतूककोंडीमध्ये भर पडेल. मागेल त्याला परवाना, असे न करता त्यासाठी निकष ठरवावे.ज्याला नोकरी, व्यवसाय असेल त्याला परवाना देण्यात येऊ नये. त्यासाठी परवाना आधारक्रमांकाशी जोडावा, असे डॉ. आढाव यांनी या वेळी स्पष्ट केले. डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांची भेटघेऊन त्यांना मागण्यांचे निवेदनदिले.