शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात पारंपरिक साड्यांशिवाय रंगत नाही....( लाईफ स्टाईल पान)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

लग्नामध्ये पैठणीबरोबरच ‘नारायण पेठी’ साडीचा प्रकारही हमखास वापरला जातो. ही साडी नेसायला अगदी सोपी आणि अतिशय हलकी दिसत ...

लग्नामध्ये पैठणीबरोबरच ‘नारायण पेठी’ साडीचा प्रकारही हमखास वापरला जातो. ही साडी नेसायला अगदी सोपी आणि अतिशय हलकी दिसत असली तरी तिचा लूक अगदम ‘रॉयल’ दिसतो. या साडीच्या काठालाच जास्त महत्त्व आहे. ही साडी पाचवार, सहावार आणि नऊवार अशा तिन्ही प्रकारांत उपलब्ध होते. लग्नात वधू सहसा ही साडी परिधान करीत नसल्या तरी इतर महिला या साडीला आवर्जून प्राधान्य देतात. अशीच एक सोलापूरची खास पठडीतली साडी म्हणजे ‘इरकली’. या साडीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे या साडीमध्ये सर्वच रंग गडद असतात. जे तुमच्या सौंंदर्याला चार चाँद लावतात. या साड्यांचे रंग नेहमीच्या साड्यांपेक्षा थोडे वेगळे असल्याने लग्नामध्ये ही साडी नेसायला महिलांना जास्त आवडते. तलम, मऊ मुलायम असणारी ही साडी एकदम गर्भरेशमी असते. यंत्रमाग आणि हातभाग अशा दोन स्वरूपात ही साडी विणली जाते. या साडीवरचा कशिदादेखील खूप प्रसिद्ध आहे. मूळची कर्नाटकची असलेली साडी आता महाराष्ट्राचीच झाली आहे...असाच एक साडीचा आणखी एक प्रकार म्हणजे ‘चंदेरी’... ही साडी नेसल्यानंतर ‘चम चम चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ अवतरली असल्याचेच फिलिंग येतं. ही मूळची ग्वाल्हेरजवळील चंदेरी गावची साडी. साडीची कड आणि बुट्ट्यांमध्येच तिचं सौंदर्य दडलेलं आहे. या साडीमध्ये चक्र आणि पान अशी डिझाईन्स पाहायला मिळतात. चंदेरीप्रमाणेच ’इंदूरी’ साडी देखील हल्ली लग्नामध्ये पाहायला मिळते.

’जिजामाता सिल्क’ हे नावही अनेकींना परिचित आहे. या साडीचा वेगळा असा खास चाहता वर्ग आहे. या साडीचं सौंदर्य त्याच्या बॉर्डर आणि साडीच्या काठात लपलेले आहे. या साड्या चिंतामणी आणि लाल रंगात अधिक तर पाहायला मिळतात. लग्नात विधींंमध्ये ही साडी हमखास वापरली जाते. या साडीप्रमाणेच ‘राजमाता सिल्क’देखील प्रसिद्ध आहे. अतिशय नाजूक प्रकारात मोडणारी ही साडी खूप सांभाळून वापरावी लागते. आता पुन्हा लग्नामध्ये ‘नऊवारी’ साडी नेसण्याचा एक ट्रेंड येऊ लागलाय. खास महाराष्ट्रीयन पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये लग्न करण्याकडे वधूवरांचा कल वाढतोय...नऊवारी साडी लग्नात खूप वेळ परिधान करणं अनेकींना अवघड जात असल्याने इन्स्टंट नऊवारी साडी खरेदी करण्याला देखील वधूंकडून प्राधान्य दिले जाते. थोडक्यात काय, तर लग्नामध्ये पारंपरिक साड्यांशिवाय रंगत नाही!

-----------------------