शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलने करूनही वाळूउपसा होईना बंद (दिल्ली)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST

संगमनेर : प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसली जात असून, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. अनेकदा निवेदने देऊन ...

संगमनेर : प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसली जात असून, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. अनेकदा निवेदने देऊन देखील वाळूउपसा बंद होत नसल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी बुधवारी (दि. १६) शहरातील गंगामाई घाट परिसरातील नदीपात्रात ‘झोपा काढा’ आंदोलन केले. सुमारे दीड तास सुरू असलेल्या या आंदोलनात व्यापारी, डॉक्टर, माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कासारा दुमाला (आडवी नदी) ते संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रंदिवस अवैधरीत्या वाळू उपसली जात आहे. त्यामुळे नदी परिसरातील पुरातन घाट, मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. येथून वाळूउपसा बंद व्हावा, अशी आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शहरातील प्रवरा नदीचा परिसर निसर्गरम्य आहे. येथे नगर परिषदेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, या परिसराची अवैधरीत्या सुरू असलेल्या वाळूउपशाने मोठी हानी झाली आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून, पोहायला अथवा गणेश विसर्जनासाठी आलेल्या अनेकांचा खड्ड्यांमध्ये बुडून मृत्यू झाला.

पुरातन व नवीन घाट देखील खचले आहेत. पात्रातील विहिरी व पाईपलाईन उघड्या पडल्या आहेत. विहिरींची पाण्याची पातळी खालावली आहे. पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासाकडे प्रशासकीय अधिकारी ‘अर्थपूर्ण’ संबंधातून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. वाळूउपसा न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

-------------

वाळू तस्कर होणार तडीपार

अवैधरीत्या वाळूउपसा व वाहतूक रोखण्याकरिता भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस व महसूल प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात येतील. यापूर्वी अनेक गुन्हे दाखल करीत कारवाई करण्यात आली. तालुका मोठा असल्याने कारवाई करताना काही अडचणी येतात. वाळूचोरीचे दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेल्यांना तडीपार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, संगमनेर विभाग

............

फोटो नेम : १६ संगमनेर

ओळ : अवैधरीत्या सुरू असलेला वाळूउपसा रोखण्यासाठी शहरातील गंगामाई घाट परिसरातील नदीपात्रात ‘झोपा काढा’ आंदोलन करण्यात आले.