शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

स्थापलीच नाही चौकशी समिती

By admin | Updated: August 13, 2014 04:19 IST

या समितीत अ‍ॅड. रमा सरोदे यांना घेण्यास आयोगाने सांगितले होते. मात्र अजूनपर्यंत पालिकेने सरोदे यांच्याशी संपर्कच साधलेला नाही.

पुणे : पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याचा त्यांच्या विभागप्रमुखांकडून होत असलेल्या छळाचा तपास करण्यासाठी राज्य महिला आयोगाने दोन महिन्यांपूर्वी समिती स्थापण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांना दिले होते. ही समिती स्थापून तीन महिन्यांत अहवाल द्यावा, असे महिला आयोगाने सांगितलेले असताना, प्रत्यक्षात ही समितीच अजून अस्तित्वात आलेली नाही. विशेष म्हणजे, या समितीत अ‍ॅड. रमा सरोदे यांना घेण्यास आयोगाने सांगितले होते. मात्र अजूनपर्यंत पालिकेने सरोदे यांच्याशी संपर्कच साधलेला नाही. यावरून पालिकेने राज्य महिला आयोगाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कामाच्या ठिकाणी विभागप्रमुखांकडून छळ होत असल्याच्या कारणावरून पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. त्याची तातडीने दखल घेत आयोगाने सुनावणी सुरू केली होती. या सुनावणीला संबंधित महिला अधिकारी आणि पालिकेचे आयुक्त यांना वेळोवेळी हजर राहण्याचे आदेश आयोगाने दिले होते. मात्र पालिका आयुक्त हजरच राहिले नाहीत. त्यामुळे २६ मे रोजी आयोगाने पालिकेला आदेश दिला, की संबंधित महिला अधिकाऱ्याचे कामकाज दुसऱ्या प्रमुखांकडे ७ दिवसांत द्यावे आणि या छळाची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. ज्यामध्ये अ‍ॅड. रमा सरोदे यांना घेण्यात यावे आणि त्यांच्यासमवेत तपास करण्यात यावा. हा आदेश देऊन दोन महिने उलटून गेले तरी अशी कोणतीही समिती पालिकेने स्थापलेली नाही. (प्रतिनिधी)