शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

निधी जिल्हा परिषदेचा, नाव आमदारांचे

By admin | Updated: December 20, 2014 23:14 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काही आमदारांना विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये निधी दिला आहे.

पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काही आमदारांना विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये निधी दिला आहे. मात्र, अनेक विकासकामांच्या ठिकाणी आमदारांनी त्यांच्या नावाचे फलक लावले आहेत. जिल्हा परिषदेचा पैसा असताना आमदारांची नावे का? असा प्रश्न उपस्थित करीत शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्याला विरोध करण्यात आला. जिल्हा परिषदेने काही आमदारांना विकासकामांसाठी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला आहे. यावर सदस्य कुलदीप कोंडे यांनी आक्षेप घेतला. आमदारांना राज्य शासनाकडून निधी दिला जात असताना जिल्हा परिषदेकडून निधी देण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या आमदारांनी रस्ते तसेच इतर कामांच्या ठिकाणी त्यांच्या नावांचे फलक लावले आहेत. त्यावर जिल्हा परिषदेचा काहीही उल्लेख नाही. परिषदेचा पैसा असताना आमदार त्याचे श्रेय घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचे फलक हटवून जिल्हा परिषदेचे फलक लावावेत, अशी मागणी कोंडे यांनी केली. यावर सदस्य आशा बुचके यांनीही सत्ताधारी पक्षाकडून राजकारण केल्याचा आरोप केला. यावर बोलताना परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले, जिल्हा परिषदेचा निधीतून केलेल्या विकासकामांच्या ठिकाणी संबंधित आमदारांच्या नावाचे फलक असतील, तर त्याची पाहणी केली जाईल. ज्या ठिकाणी असे फलक दिसतील, तेथील आमदारांचे फलक काढून त्या जागी जिल्हा परिषदेच्या नावाचे फलक लावले जातील. त्याबाबत प्रशासनाकडून दक्षता घेतली जाईल. सभेत विविध विषय समित्यांच्या रिक्त पदांची निवडणूक बिनविरोध झाली. तसेच या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आमदार दत्तात्रय भरणे व माजी सदस्य, आमदार सुरेश गोरे यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)रोजगार हमीवर चर्चाच नाहीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या २०१५-१६ सालचा वार्षिक कृती आराखडा सर्वसाधारण सभेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आला. राज्य सरकारने पुढील वर्षीच्या निधीत मोठी कपात केली आहे. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. तसेच अवकाळी पावसानेही काही भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेकांसमोर आर्थिक संकट उभे राहू शकते. या पार्श्वभूमीवर रोजगार हमीच्या कामांमुळे हातभार मिळू शकतो. मात्र, यंदा शासनाने जिल्ह्यासाठी केवळ ५३ कोटींचा आराखडा दिला आहे. या निधीत वाढ करण्याबाबत सभेत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, सर्वच सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणतीही चर्चा न करता काही सेकंदात हा आराखडा मंजूर करण्यात आला.