शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळेलाही आयएसओ मानांकन

By admin | Updated: October 1, 2015 00:41 IST

पटसंख्येअभावी महापालिकेच्या शाळा बंद होत असताना तळवडेतील कै. किसनराव भालेकर शाळेस गुणवत्तेचे ‘आयएसओ ९००१’ मानांकन मिळाले आहे

विश्वास मोरे, पिंपरीपटसंख्येअभावी महापालिकेच्या शाळा बंद होत असताना तळवडेतील कै. किसनराव भालेकर शाळेस गुणवत्तेचे ‘आयएसओ ९००१’ मानांकन मिळाले आहे. अन्य शासकीय शाळांना शैक्षणिक गुणवत्ता आणि आदर्श कार्यप्रणालीचा वस्तुपाठ घालून देणारी राज्यातील महापालिकेची ही पहिली शाळा ठरली आहे.महानगरपालिका शिक्षण मंडळाने पुढाकार घेऊन तळवडेतील शाळेला आदर्श करण्याचा संकल्प गतवर्षी सोडला. आयएसओ मानांकनाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी सुरुवातीला शाळेतील पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा कृती आराखडा तयार करून नियोजनानुसार अंमलबजावणी झाली. पटसंख्या कमी होणार नाही, विद्यार्थी अनुपस्थिती कमी करणे, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात आला. तसेच, शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी, तसेच ई-लर्निंग, नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा वापर करून सोलरवर वीजनिर्मिती करणे, गांडूळखत प्रकल्प, औषधी वनस्पतीची लागवड, परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आले. संगणक, विज्ञान लॅब, लायब्ररीची निर्मिती, व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. शासकीय, निमशासकीय शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. महापालिका शाळेतही गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाऊ शकते. महापालिका शाळांकडे विद्यार्थी वळावेत, पटसंख्या वाढावी यासाठी गुणवत्तावाढीचा उपक्रम राबविण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर तळवडेतील शाळेत हा उपक्रम राबविला. आयएसओ ही गुणवत्ता चळवळ महापालिका शाळांत राबवायची आहे. अशा प्रकारची आयएसओ प्रमाणपत्र मिळविणारी पहिली शाळा असावी.- आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, शिक्षण मंडळ, महापालिका