शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दुसऱ्या चाचणीसाठी उजाडणार नवीन वर्ष?

By admin | Updated: November 10, 2015 01:53 IST

राज्यात पहिले सत्र संपून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या, तरी अद्याप शाळांमध्ये नैदानिक चाचण्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या चाचणीसाठीची ई-टेंडरिंगची प्रक्रियाच सुरू झालेली नाही

पुणे : राज्यात पहिले सत्र संपून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या, तरी अद्याप शाळांमध्ये नैदानिक चाचण्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या चाचणीसाठीची ई-टेंडरिंगची प्रक्रियाच सुरू झालेली नाही. यामुळे या चाचणीसाठी नवे वर्षच उजाडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.याअंतर्गत जुलैमध्ये अपेक्षित असणारी चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून ७ आॅक्टोबरपर्यंत घेण्यात आली. पहिलीच चाचणी लांबल्याने आॅक्टोबरमध्ये अपेक्षित असणारी दुसरी चाचणी लांबणीवर पडली. त्यामुळे दुसऱ्या चाचणीला अधिक उशीर न करता ती डिसेंबरमध्ये घेतली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. या चाचणीसाठी त्रयस्थ संस्थेद्वारे चाचण्या घेण्यात येणार आहेत. यासाठी एससीईआरटीने इच्छुकांची नावे मागवली होती. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद न लाभल्याने ई-टेंडरिंग करून संस्थांची निवड केली जाणार होती.महिन्यात घेण्यात आली, तर दुसरी चाचणी आॅक्टोबरमध्ये अपेक्षित असली, तरीही शिक्षण विभागाने पहिल्याच चाचणीला लावलेला विलंब पाहता ही चाचणी डिसेंबरमध्ये होणार, अशी चर्चा सुरू आहे. राज्यातील ४ हजार २०० शाळांमध्ये त्रयस्थ संस्थेद्वारे चाचण्या घेण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्या त्रयस्थ संस्था भाग घेण्यास उत्सुक आहेत, हे पाहण्यासाठी परिषदेने यापूर्वी इच्छुकांची नावे मागविली होती. मात्र, आता या संस्थांसाठी ई-टेंडरिंग केले जाणार आहे व त्यानंतर संस्थांची निवड करून परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये टेंडर काढल्यानंतर २१ दिवसांचा कालावधी संस्थांना द्यावा लागणार आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया तसेच परीक्षा पद्धती या सर्व गोष्टीसाठी १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्याचबरोबर दुसऱ्या चाचणीसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचेही काम परिषदेकडेच आहे. त्यामुळे इतक्या कमी दिवसांत हे काम होऊन डिसेंबरमध्ये तरी दुसरी चाचणी होईल का? याबाबत शंका आहे.