शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी निर्मूलनामध्ये पुण्याचा नवा आदर्श

By admin | Updated: February 17, 2015 23:46 IST

येरवडा येथील महात्मा गांधीनगर आणि जयप्रकाशनगर येथील झोपडपट्टीधारकांचे बीएसयूपी मधील इन्स्टिट्यूटमधून पुनर्वसन करण्यात आले आहे.

पुणे : येरवडा येथील महात्मा गांधीनगर आणि जयप्रकाशनगर येथील झोपडपट्टीधारकांचे बीएसयूपी मधील इन्स्टिट्यूटमधून पुनर्वसन करण्यात आले आहे. हे पुनर्वसन पूर्ण झाल्याने या जागेचा सातबारा नागरिकांच्या नावावर करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय महापालिकेने दिला आहे. त्यामुळे या ठिकाणची झोपडपट्टी विघोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या दोन्ही झोपडपट्टया राज्यातील पहिल्या विघोषित झोपडपट्टया ठरणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णेगुरूजी यांनी सोमवारी दिली. येरवडा येथील सर्व्हे क्रमांक १०३ मध्ये असलेल्या सरकारी जमिनीवर जयप्रकाशनगर व महात्मा गांधीनगर झोपडपट्टी आहे. १९८३ ते ८६ या वर्षामध्ये या भागात गलिच्छ वस्ती निर्मूलन (गवनी) योजना वेळोवेळी घोषित झाली. त्यामुळे महापालिकेकडून गवनी, वाल्मीकी योजना आणि बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर (बीएसयूपी) योजनेअंतर्गत या भागातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुणे महापालिका तसेच राज्य सरकारच्या मागासवर्गीय कल्याण निधीतून या भागात भूमिगत गटारे, भूमिगत विद्युत पुरवठा, प्रत्येक झोपडपट्टीला स्वतंत्र नळ कनेक्शन, गल्लीबोळात सिमेंट क्राँक्रिटचे रस्ते सार्वजनिक शौचालये, महापालिकेची मराठी, इंग्रजी माध्यमाची शाळा, महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, समाजमंदिरे, व्यायामशाळा यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहेत. या भागात मोठया प्रमाणात पक्क्या स्वरुपाचे बांधकाम झाले आहे. बहुतेक नागरिकांनी आरसीसी बांधकामही पूर्ण केले आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या दोन्ही झोपडपट्टया विकसित झाल्याने येथे सध्या असलेल्या सोयी-सुविधांचा विचार करता भविष्यकाळात येथे देखभाल व दुरुस्तीसाठी मोठा निधी महापालिकेला द्यावा लागणार आहे. या भागात विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी झोपडपट्टीवासीयांकडून घेण्यात येणारे सेवा शुल्क रद्द करून बांधण्यात आलेल्या इमारतींकडून मिळकतकर वसूल करणे गरजेचे आहे. यासाठी ही झोपडपट्टी विघोषित करून येथे गावठाण जाहीर करणे क्रमप्राप्त आहे. या झोपडपट्टीची जागा स्थानिक रहिवाशांच्या नावावर करावी, असा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी पालिकेला दिला होता. त्यावर प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला होता. प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय देत झोपडपट्टी विघोषित करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय दिला.