शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नियोजनशून्य उड्डाणपूल

By admin | Updated: May 16, 2017 06:49 IST

नियोजन आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच हडपसरमधील वाहतूककोंडी जैसे थे आहे. चार उड्डाणपूल होऊनही वाहनचालक वाहन

लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : नियोजन आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच हडपसरमधील वाहतूककोंडी जैसे थे आहे. चार उड्डाणपूल होऊनही वाहनचालक वाहन चालविताना, तर नागरिक रस्ता ओलांडताना दररोज तारेवरची कसरत करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक, शाळा-महाविद्यालयातील मुलांना जीव मुठीत धरून दररोज ये-जा करावी लागत आहे. पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून नाही, तर वाहतूककोंडीत हरवलेले हडपसर हीच मोठी ओळख बनली आहे. हडपसरमधील पहिलावहिला गाडीतळ ते डांगमाळी तालीम असा ९०० मीटर लांबीचा पूल पूर्ण झाला. या पुलाचे उद्घाटनही दोनदा झाले. त्यानंतर मगरपट्टा चौकात वाहतूककोंडी होत असल्यामुळे पुन्हा तेथे दुसरा उड्डाणपूल उभारला. त्यानंतर गाडीतळावरून सासवडकडे जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होत असल्यामुळे एल आकाराच्या पूल करण्यात आला. सासवडकडून पुण्याकडे जाणारा पूल झाल्यानंतर पुलाच्या बाजूला पथारीवाल्यांसाठी बांधलेली दुकाने पाडली आणि पुन्हा बंटर बर्नाट स्कूलची भिंंत आतमध्ये सरकवून तेथे त्यांना दुकानांसाठी गाळे बांधले. आता पुण्याकडून सासवडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उड्डाणपूल करण्यात आला. एकापाठोपाठ चार उड्डाणपूल झाले, तरीही हडपसरमधील वाहतूककोंडी का सुटत नाही, हा प्रश्न गंभीर आहे.हडपसरमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ५ किलोमीटर लांबीच्या नियोजित उड्डाणपुलाची लांबी अवघी ९०० मीटरवर आणली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या प्रॉपर्टी वाचविण्यासाठी पूल लांबविल्याचे नागरिकांनी सांगितले. हडपसरमध्ये उड्डाणपूल झाला; मात्र त्यामुळे वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनल्याने नागरिक त्रस्त झाले.आकाशवाणी ते वैदूवाडी चौकादरम्यानच्या पुलावर मगरपट्टा चौकात नगर रोडकडे जाण्यासाठी आणि गाडीतळावरून सासवडकडे जाण्यासाठी एल अशी या पुलाची रचना होती. मात्र, प्रत्यक्षात तो गाडीतळ ते डांगमाळी तालीम म्हणजे अवघा ९०० मीटर लांबीचा झाला. त्यामुळे गांधी चौकातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली. मात्र, मगरपट्टा चौक आणि गाडीतळावर कोंडी जैसे थे राहिली. त्यामुळे पुन्हा मगरपट्टा चौकात उड्डाणपूल बांधला आणि आता गाडीतळावर सासवडकडून पुण्याकडे जाण्यासाठी पूल बांधला.मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठारलोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आकुर्डी रेल्वे स्थानक रस्त्यावर शनिवारी एका मोटारीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या तुषार राजू केंदळे (वय २५,रा. शिंदेवस्ती, रावेत) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याबाबत तुषारचे काका प्रवीण केंदळे (वय ३७, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना त्याला एका अज्ञात मोटारीने जोरात धडक दिली. यामध्ये तुषार हा गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. संरक्षक कठडे उंच हवेतपुलाला उभारलेले संरक्षक कठडे अत्यंत कमी उंचीचे आहेत. मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून दुचाकीस्वार थेट जमिनीवर आदळला होता; मात्र सुदैवाने तातडीने उपचार केल्यामुळे तो वाचला. पाचही उड्डाणपुलांच्या संरक्षक कठड्याची उंची वाढवण्याची गरज आहे. कठड्याची उंची कमी असल्यामुळे पुलावरून वाहन चालवतानाही धोकादायक वाटू लागत असल्याने चालकांनी सांगितले.1सोलापूर रस्त्यावरील हडपसरमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वीस वर्षांपूर्वी पाच किलोमीटर लांबीच्या पुलाचे नियोजन केले. मगरपट्टा चौकातीलकोंडी सोडविण्यासाठी नियोजनशून्य पूल उभारला. अवघ्या पाच किलोमीटर अंतरारामध्ये चार उड्डाणपूल होऊनही वाहतूककोंडी सुरळीत होण्याऐवजी अत्यंत धोकादायक बनली आहे. 2शहराबरोबर उपनगराचा विस्तार झपाट्याने झाला आणि कोंडीचा प्रश्न गंभीर बनू लागला. त्यावर उपाय म्हणून उड्डाणपुलाचा पर्याय समोर आला. दूरदृष्टी नसल्यामुळेच सोलापूर आणि सासवड रस्त्यावरील वाहतूककोंडी दिवसेंदिवस जटिल बनत आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, ते होताना दिसत नसल्याची खंत सुज्ञ मंडळींनी व्यक्त केली.