शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळी टोळीकडून ६५ तोळे सोने जप्त

By admin | Updated: February 23, 2017 03:29 IST

चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकाने बाणेर-बालेवाडी भागामध्ये घरफोड्या करणाऱ्या

पुणे : चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकाने बाणेर-बालेवाडी भागामध्ये घरफोड्या करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या नेपाळी टोळीला गजाआड केले आहे. त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांतील ६ किलो चांदी आणि ६५ तोळे सोने हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती परिमंडल तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. दीपक ऊर्फ गुरू रंगनाथ जोशी (वय ३३, रा.पालघर), सागर देवराज ख्याती (वय ३३, रा.पिंपरी), पदमबहादूर लच्छीबहादूर शाही (वय ४३, रा. भोसरी), जगत कालू शाही (वय ३५, रा. वाकड), जनक गोरख शाही (वय ४०, रा. काळेवाडी) आणि गगन ऊर्फ काल्या कोपुरे कामी (वय २७, रा. बालेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण मूळचे नेपाळचे राहणारे आहेत. पोलिसांनी निरापद सुदर्शन दास (वय ५४, रा. पालघर) व एकेंद्र प्रसाद नाथ (वय ३७) या सराफांना अटक केली आहे. आरोपी पुण्यामध्ये विविध सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. यातील काल्या हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून त्याने नोव्हेंबर २०१६ ते जानेवारीदरम्यान केलेले पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. काही जण मुख्य रस्त्यावर थांबून देखरेख करायचे, तर काही जण सोसायटीच्या आवारात थांबायचे. उर्वरीत सर्वजण घरफोडी करण्यासाठी जात असत. तपासादरम्यान २३ लाख २२ हजार ६०० किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)