पुणो : भिमा खो:यात आज दिवसभर झालेल्या पावसामुळे 8 धरणांमधून नद्यांमध्ये पाणी सोडले जात होते. रात्री बंडगार्डन येथून 3क् हजार क्युसेक प्रतिसेकंद पाणी वाहत होते. मुठा नदीतून येणारे पाणी वाढल्यास हा विसर्ग 5क् हजार क्युसेक होऊ शकेल असे सिंचन विभागातर्फे आज सांगण्यात आले.
धरणो 9क् टक्केभरल्यानंतर सुरक्षितता म्हणून नद्यांमध्ये पाणी सोडले जात होते. येडगाव धरणातून कुकडी नदीत 3क्15 प्रतिसेकंद क्युसेक पाणी सोडले जात होते. भिमा नदीत चासकमानमधून 13 हजार 468 क्युसेक, कासारसाई धरणातून 4228 तर वडीवळे धरणातून 41क्क् क्युसेक पाणी सोडले जात होते. भिमा नदीचे पात्र त्यामुळे दुथडी भरून वाहत असून हे पाणी उजनी धरणाला जाऊन मिळेल. वीर धरणातून नीरा नदीत 14311 क्युसेक विसर्ग सुरू होता.
रात्री पावसाचा जोर वाढला तर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागेल अशी माहिती वरिष्ठ अधिकारी ए. ए. कपोले यांनी सांगितली. खडकवासल्यातून मुठा नदीत 9394 क्युसेक आणि मुळशी धरणातून मुळा नदीत 3क् हजार क्युसेक पाणी सोडले जात होते. यामुळे बंडगार्डन येथील पात्र रात्री साडेनऊच्या सुमारास 3क् हजार क्युसेकने वाहत होते. मुळशीतून पाणी जादा सोडले गेल्यास हा विसर्ग 5क् हजार क्युसेकर्पयत जाऊ शकेल, असे सांगून कपोले यांनी नदीकाठच्या रहिवाशांनी खबरदारीचा इशारा दिला. (प्रतिनिधी
चासकमान धरणातून विसर्ग
चासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पडणा:या पावसामुळे चासकमान धरण भरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडून नदीपात्रत पाच हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रत मुसळधार पाऊस पडत असून, धरणाच्या पाणीसाठय़ात सहा हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रत 24 तासांत पडलेला पाऊस : भीमाशंकर - 138 मि. मी., भोरगिरी - 12क् मि. मी., औदर - 38 मि. मी., वाडा - 24 मि. मी., खरोशी - 28 मि. मी., चासकमान धरण 8 मि. मी. धरणाच्या पाणलोट क्षेत्रत पावसाचा जोर असाच राहिल्यास नदीपात्रत जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, असे शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी सांगितले. धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)
धरण क्षेत्रत
पुन्हा जोरदार
गेल्या चोवीस तासात खडकवसाला वगळता या प्रणालीतील वरसगाव, पानशेत, टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रीत गेल्या चोवीस तासात मुसळाधार पाऊस झाला आहे. दरम्यान, या चारही धरणातील पाणीसाठा आज 2क़्42 टीएमसीवर पोहचला आहे. गेल्या चोवीस तासात धरणात तब्बल 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.