शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या स्थितीत समाजवाद शोधणे गरजेचे

By admin | Updated: January 23, 2017 02:12 IST

राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांनी संघर्षाला मूर्त स्वरूप दिले. नव्या परिस्थितीच्या आव्हानामध्ये समाजवादाचा

पुणे : राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांनी संघर्षाला मूर्त स्वरूप दिले. नव्या परिस्थितीच्या आव्हानामध्ये समाजवादाचा अर्थ काय, याचे उत्तर युवकांनी शोधावे आणि जातीयवाद, सांप्रदायिकता यांच्याविरोधात गावोगावी जाऊन संघर्ष करावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शनिवारी येथे केले. ‘हम समाजवादी संस्थाएं’ या संघटनेतर्फे राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयामध्ये अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन मेधा पाटकर, ज्येष्ठ समाजावादी नेते भाई वैद्य, दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संंघटनेचा अध्यक्ष मोहित पांडे, ओडिशामधील युवानेत्या मनोरमा यांच्या हस्ते झाले. राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री सदाशिव मगदूम, ज्येष्ठ नेते जी. जी. पारीख, युसुफ मेहरअली युवा बिरादरीच्या गुड्डी, लोकायतचे निश्चय मात्रे व्यासपीठावर होते. विविध नेत्यांनी आणि श्रोत्यांनी भाषणांदरम्यान भूकमारीसे आझादी, मनुवाद से आझादी, मोदीशाहीसे आझादी अशा घोषणा दिल्या. देशाच्या विविध भागातील कार्यकर्ते संमेलनासाठी उपस्थित आहेत. उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे. मनोरमा यांनी ओडिशामध्ये पोस्को कंपनीच्या जमीन अधिग्रहणाविरुद्ध दिलेल्या लढ्याची व त्यासाठी झेललेल्या सरकारी अत्याचाराची कहाणी सांगितली. गांधी, लोहिया, आंबेडकर यांचे समतेचे स्वप्न साकारण्यासाठी युवकांनी लढा उभारावा, असे आवाहन त्यांनी केले. मगदूम यांनी प्रास्ताविक केले. मात्रे याने संमेलनाची रूपरेषा सांगितली. गुड्डी हिने सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)