शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ब्रॉडबँंड पोहोचविण्याची गरज

By admin | Updated: May 19, 2014 01:00 IST

गेल्या काही वर्षांत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत, त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरच दळणवळण हा मूलभूत हक्क झाला पाहिजे.

पुणे : ‘गेल्या काही वर्षांत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत, त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरच दळणवळण हा मूलभूत हक्क झाला पाहिजे. मात्र, सध्या ब्रॉडबँड सेवांचे जाळे शहरी भागापुरते मर्यादित झाले असून शाश्वत विकासासाठी ही सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याची गरज आहे,’ असे मत भारत संचार निगम लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक के. के. सक्सेना यांनी व्यक्त केले. इन्स्टिट्यूूट आॅफ इंजिनिअर्सतर्फे जागतिक दूरसंचार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते ‘शाश्वत विकासात ब्रॉडबँडचे महत्त्व’ या विषयावर बोलत होते. ‘अवया’ संशोधन प्रयोगशाळेचे संशोधक संचालक रामानुजन काशी, संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. के. शिंदे, गोरखनाथ घाडगे, सचिव विजय घोगरे, डॉ. एस. आर. जोग, डॉ. आर. बी. इंगळे, जी. के. डावरा, के. के. घोष या वेळी उपस्थित होते. सक्सेना म्हणाले, ‘मोबाईल, इंटरनेट यांमुळे प्रत्येकाला दळणवळणाचा सोपा पर्याय मिळाला आहे. मात्र, ही सेवा स्वस्तात आणि अधिक गतीने पोहोचण्यासाठी ब्रॉडबँडमध्ये संशोधनाची गरज आहे, त्यामुळे शिक्षण, पर्यटन, अॉटोमोबाईल, वैद्यकीय, गृहिणींसाठी विविध सेवा मिळू शकतील. या क्षेत्रामध्ये स्पेक्ट्रम विकण्यासंदर्भात आणि त्यातील किमतींच्या चढ-उतारासंबंधात अनेक प्रश्न आहेत. मात्र, हे प्रश्न पायाभूत सुविधा वाढले तर त्वरित सुटण्यासारखे आहेत.’ ब्रॉडबँडची सेवा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने सुविधा दिल्या पाहिजेत. इंटरनेटची सेवा शहरी भागात मर्यादित न राहता ग्रामीण भागात पोहोचल्यास विकासाला गती मिळेल, त्यामुळे केंद्र सरकारने देशातील दोन लाख ५० हजार ग्रामपंचायतींना जोडण्याचे धोरण जाहीर केले आहे. काशी म्हणाले, ‘काही प्रगत देशांमध्ये ब्रॉडबँड सेवेची गती चांगली असल्यामुळे रोजगार वाढले आहेत. भारतातही अशाप्रकारे स्पिड वाढल्यास रोजगारास गती मिळेल, त्यासाठी या सेवांचा विस्तार करून नंतर त्याची गती वाढविली पाहिजे.’