शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये राष्ट्रवादीच्या अनिल राक्षे यांची माघार

By admin | Updated: February 14, 2017 01:45 IST

निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सांडभोरवाडी-काळूस गटामध्ये राष्ट्रवादी काँगेसकडून इच्छुक असलेले अनिल (बाबा) राक्षे

राजगुरुनगर : निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सांडभोरवाडी-काळूस गटामध्ये राष्ट्रवादी काँगेसकडून इच्छुक असलेले अनिल (बाबा) राक्षे यांनी सोमवारी अचानक माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला याचा फायदा होईल का, याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू झाली आहे. अनिल राक्षे यांचे तिकीट कापून माजी आमदार दिलीप मोहिते यांनी त्यांचे समर्थक अरुण थिगळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती. त्यामुळे गेले चार दिवस अनिल राक्षे बंडखोरी करतात का, याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू होती.यासंदर्भात राक्षे म्हणाले, ‘‘मी अजित पवार यांना मानणारा कार्यकर्ता आहे. पक्षहितासाठी मी माघार घेतली आहे. यापूर्वी मी अपक्ष निवडून आलेलो असल्यामुळे मला ही निवडणूक अजिबात अवघड नव्हती.’’ राक्षेंच्या माघारीमुळे आता राष्ट्रवादीचे अरुण थिगळे व शिवसेनेचे बाबाजी काळे यांच्यामध्ये तीव्र चुरस होण्याची शक्यता आहे. भाजपानेही धनंजय गारगोटे यांना उमेदवारी दिली आहे. थिगळे व काळे हे सांडभोरवाडी गणातील एकाच भागातील आहेत. गारगोटे काळूस गणातील आहेत. त्यामुळे काळूस गणातून गारगोटेंना किती फायदा होईल, यावर दोन्हीही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहील. दरम्यान, सांडभोरवाडी गणातून शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या सरपंच कविता पाचारणे यांनीही अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता या गणामध्ये राष्ट्रवादीच्या साळुबाई मांजरे, शिवसेनेच्या सुनीता सांडभोर, भाजपाच्या रूपाली चव्हाण, काँग्रेसच्या शुभांगी वाळूंज यांच्यात लढत होणार आहे. काळूसमधून भाजपाच्या उमेदवार मीनाक्षी लोणारी यांनी माघार घेतल्याने तेथे शिवसेनेच्या ज्योती अरगडे आणि राष्ट्रवादीच्या सुरेखा टोपे यांच्यामध्ये चुरस होणार आहे. त्यामुळे या गटात व गणामध्ये सर्वच पक्षांचा व नेत्यांचा कस लागणार आहे. आमदार सुरेश गोरे व माजी आमदार दिलीप मोहिते यांनी या गट व गणासाठी पक्षश्रेष्ठींकडून भांडून समर्थकांना उमेदवारी आणलेली आहे. त्यामुळे दोघांच्याही प्रतिष्ठेची निवडणूक या गट-गणांची झालेली आहे. (वार्ताहर)