शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता येईल

By admin | Updated: May 22, 2016 01:01 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करून महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्याचा विश्वास पक्षाच्या शहराध्यक्ष

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करून महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्याचा विश्वास पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.२०) व्यक्त केला शहराध्यक्षपदी अ‍ॅड. चव्हाण यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार त्यांचा करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, मोहनसिंग राजपाल, शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, नगरसेविका नंदा लोणकर, लक्ष्मीताई दुधाणे, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, मोहिनी देवकर, नगरसेवक विशाल तांबे, शिवालाल भोसले, अप्पा रेणूसे, प्रदीप गायकवाड, महिला शहराध्यक्ष रूपाली चाकणकर, इक्बाल शेख, मनाली भिलारे, राकेश कामठे, नितीन ऊर्फ बबलू जाधव, शालिनी जगताप, आनंद रिठे या वेळी उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना चव्हाण म्हणाल्या, की पक्षाने केलेल्या चांगल्या कामामुळे २०१७ च्या निवडणुकीत पुणेकर नक्कीच यश देतील. परंतु याकरीता पक्ष संघटन जास्त महत्त्वाचे आहे. एकत्रितपणे काम केल्यास यश नक्कीच मिळणार आहे. २४ तास पक्ष कसा वाढेल, शहर चांगले कसे ठेवता येईल, त्यासाठी आपण काय केले पाहिजे, याचाच विचार मी करते आणि तो पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले. (प्रतिनिधी)