पुणो : हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे..
4अशीच साद आज निसर्ग प्रत्येकाच्या मनाला घालत आहे. उशिरा का असेना पण पुणोकरांना दिलासा देत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे एवढय़ा दिवस शुष्क झालेला निसर्ग टवटवीत झाला आहे. नवीनच फुललेली हिरवळ आणि बरसणा:या पाऊसधारा अनुभवण्याचा धम्माल ‘विकेंड प्लॅन’ केला जात आहे.
4पुण्यनगरी शिक्षण, संस्कृतीसाठी जशी प्रसिद्ध आहे तसेच या शहराच्या आजुबाजूला अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. जेथे एक किंवा दोन दिवसाची निसर्गसान्निध्याची सहल आयोजित करता येऊ शकते. अगदी जवळचे म्हणजे खडकवासला धरण, मुळशी धरण, सिंहगड ही ठिकाणो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. परंतु या पलीकडेही मस्त दुचाकीवर एक-दोन दिवसांची सहल आयोजित करण्यासारखी 15क्-2क्क् किलोमीटरच्या अंतरावर अनेक ठिकाणो आहेत.
4वरंधा घाट - निसर्गरम्य, भरपूर धबधबे, वाफाळलेला चहा, गरमागरम भजी, कधी हलका तर कधी जोरदार सरी बरसणारा पाऊस, असा डोळ्यांद्वारे मनालाही गारवा देणारा वरंधा घाट आहे. हे ठिकाण पुण्यापासून 82 किलोमीटरवर आहे. भोरमार्गे गेल्यास अजून एक प्रेक्षणीय स्थळ अनुभवता येते. येथील राजवाडा अत्यंत सुदंर व नवा अनुभव देणारा आहे. मित्र-मैत्रिणींसोबत एका दिवसात जाऊन येण्याचे नियोजन करत असाल तर हा उत्तम पर्याय आहे.
4रायगड- छत्रपती शिवरायांच्या गौरवाने रायगडाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहेच; परंतु तेवढाच निसर्गसौंदर्याने भरलेला हा गड आहे. येथे ताम्हिणी घाटमार्गे महाडवरून जावे लागते. पुण्यापासून रायगड 125 किलोमीटर असून, ताम्हिणीपासून महाड 47 किलोमीटर व महाड पासून रायगड 25 किलोमीटर आहे. वाटेत महाड येथेदेखील बघण्यासारख्या बौद्धलेण्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेले चवदार तळे ही दोन ठिकाणो आहेत.
4राजगड - राजगड या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व तर आहेच सोबत अप्रतिम सौंदर्यस्थळांचे वरदानही आहे. येथील बालेकिल्ला, सुवेळा, संजीवनी व पद्मावती या तीन माच्या, पद्मावती तलाव, नेढे, सईबाई स्मारक ही बघण्यासारखी ठिकाणो आहेत. ट्रेक करण्यासाठी उत्तम जागा आहे. परंतु पावसाळ्यात निसरडा होणारा रस्ता आणि उंचच उंच कठडे असल्याने अपघात होण्याची शक्यताही असते. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन येथे जाणो आवश्यक आहे. पुण्यापासून राजगड 70 किलोमीटर अंतरावर आहे.
4राजमाची - पावसाळ्यात ट्रेक करायचा विचार आला, की मनात पहिले नाव राजमाचीचे आठवावे असे हे ठिकाण आहे. लोणावळ्यावरून पायी वर राजमाचीच्या दिशेने जावे लागते. मस्त कणीस, भजी खात हा प्रवास रमतगमत केला जातो. लोणावळ्यार्पयत जाताना अलीकडील स्टेशन मळवली आहे. येथे सुंदर सात धबधबे वाटेत लागतात. तसेच पुढे लोहगडाकडे जाण्याचा हा रस्ता आहे. राजमाचीचा ट्रेक ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी लोहगड हादेखील उत्तम पर्याय होऊ शकतो. राजमाची पुण्यापासून 1क्6 किलोमीटर अंतरावर आहे.
4नाणोघाट - अत्यंत रम्य व मनोवेधक असे हे ठिकाण आहे. जुन्नर मार्गे येथे जावे लागते. हिरवळीचा आणि पावसाचा मनसोक्त आनंद घेता येण्यासारखी जागा आहे. वाटेत जुन्नर येथील निसर्ग आणि हिरवळ अनुभवत असतानाच तेथील बिबटय़ा निवारण केंद्र हे देखील एक बघण्यासारखे ठिकाण आहे. परंतु येथे पूर्वपरवानगी घेणो आवश्यक असते.
4शिवथरघळ - संत रामदास स्वामी यांनी साधना केलेले व दासबोध लिहिलेले हे ठिकाण आहे. याचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे मोठे आहे तेवढाच येथील निसर्ग डोळ्यांचे पारणो फेडणारा आहे. गड फार उंच नसला तरी ढग जणू येथे गालिचाप्रमाणो पसरलेले असतात. चहू बाजूंनी केवळ हिरवागार निसर्ग आणि मंजूळ आवाज करत कोसळणारे धबधबे, शांत आणि रम्य असे हे ठिकाण आहे. येथे वरंधा घाटमार्गे जावे लागते. हे अंतर पुण्यापासून 90 किलोमीटर आहे.
4ताम्हिणी घाट - दुतर्फा उंच उंच वृक्षांच्या रांगा, समोर दिसणारा काळाभोर वळणावळणाचा रस्ता आणि वरून सुईप्रमाणो बोचणा:या पण त्यातही वेगळाच आनंद देणा:या पावसाचा थेंबांची बरसात अशी अनोखी अनुभूती घ्यायची असेल तर ताम्हिणी घाट उत्तम जागा आहे. चांदणी चौक, भूगावमार्गे गेलात तर 65 किलोमीटरचे अंतर आहे. वाटेत अनेक धबधबे लागतात. तेथे थांबून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता येतो. काही पठारी भागही आहेत. हे पठार फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण असल्यामुळे नकळत पाऊले येथे थांबतात. घाट दुतर्फा झाडीने वेढलेला असल्याने येथे अंधार लवकर पडतो. त्यामुळे सायंकाळी 5 नंतर घाटात जाऊ नये किंवा तोर्पयत घाटातून खाली उतरावे हा सावधगिरीचा संदेश दिला जातो.