शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

अवसरी बुद्रुक येथे मतदार यादीतून नावे गहाळ

By admin | Updated: February 22, 2017 02:06 IST

मंचर-अवसरी जिल्हा परिषद गटातील अवसरी खुर्द व अवसरी-पारगाव गटातील अवसरी बुद्रुक येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती

अवसरी : मंचर-अवसरी जिल्हा परिषद गटातील अवसरी खुर्द व अवसरी-पारगाव गटातील अवसरी बुद्रुक येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगाच रांगा लावल्या होत्या. तर, काही गावांतील मतदार यादीतून मतदारांची नावे गायब झाल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.अवसरी-पारगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील व शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्यात अटी-तटीची लढत असल्याने या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. मंगळवारी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी वाडी-वस्तीवर मतदार आणण्यासाठी चारचाकी वाहनांची सोय केली होती. मतदान झाल्यानंतर, मतदारांना चिवडालाडू, वडापाव अशी नाष्टाची सोय क रण्यात आली होती. अवसरी बुद्रुक येथील मतदान केद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मतदारांचा मोठा उत्साह जाणवत होता. अवसरी खुर्द येथेही सकाळी मतदारांची सकाळी गर्दी कमी होती. दुपारी १२ वाजल्यानंतर मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. मात्र, चालू मतदान यादीतून अनेक मतदारांची नावे गायब झाल्याने कार्यकर्ते, मतदारांना नावे शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. तर, मतदार यादीत फोटो एकाचा व नावे दुसऱ्याची अशी परिस्थिती पाहावयास मिळाली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी तालुक्यातील सर्व मतदान केंद्राला भेटी दिल्या. अवसरी खुर्द येथील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दुपारपर्यंत जेवणाची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)