शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाई झालीच नाही

By admin | Updated: June 22, 2017 06:57 IST

शहरातील नाल्यांच्या सफाईची पावसाळापूर्व कामे झाली नसल्यावर आणि पूर्वगणनपत्रके फुगविण्यात आल्यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील नाल्यांच्या सफाईची पावसाळापूर्व कामे झाली नसल्यावर आणि पूर्वगणनपत्रके फुगविण्यात आल्यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. क्षेत्रीय स्तरावरील नालेसफाईची कामे, त्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत ठेकेदारांच्या कामांची बिले थांबविण्यात येणार असून सदोष पूर्वगणनपत्रके केल्याचे आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.क्षेत्रीय कार्यालयाकडून पावसाळापूर्व कामे निविदा पद्धतीने मागविण्यात आली होती. यामध्ये बहुतांश कामे ही नालासफाईची होती; मात्र पूर्वगणनपत्रके प्रशासनाकडून फुगविण्यात आली होती. तशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात येणार आहे. नालेसफाईची कामे चुकीच्या पद्धतीने झाल्याचा, निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नालेसफाईच्या कामांचा अहवाल ठेवण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली होती. हा अहवाल फेटाळण्यात आला होता. त्यामुळे स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अविनाश बागवे आणि बाळासाहेब ओसवाल यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली. नालेसफाईची निविदा ५० ते ६० टक्के कमी दराने ठेकेदाराने भरली आहे. त्यामध्ये अनामत रक्कम आणि १२ ते १५ टक्क्यांची शासकीय वजावट लक्षात घेता, ६५ ते ७० टक्के दराने ठेकेदाराने काम केले आहे. म्हणजेच अवघ्या ३० ते ३५ टक्के निविदा रकमेत शंभर टक्क्यांचे काम करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.