शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची नग्न धिंड

By admin | Updated: May 19, 2017 04:34 IST

मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथील मावळे आळीमध्ये मंगळवारी साडेआठच्या सुमारास घडल्याचे

- लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथील मावळे आळीमध्ये मंगळवारी साडेआठच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलाच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीमुळे वारजे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. नवीन कुंदन खुराना (वय ४७), यश नवीन खुराना (वय १९), राजू पिराराम देवासी (वय २४), प्रदीप श्रीकृष्ण साळुंखे (वय ३५, सर्व रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा व संबंधित मुलगी कोथरूडमधील एका शाळेत शिकत आहेत. हा मुलगा संबंधित मुलीची छेड काढून तिला त्रास देतो असा आरोपींचा समज झाला. मंगळवारी रात्री आठ वाजता एका मित्राला सोडण्यासाठी तो येथील मावळे आळी येथे गेला होता. पीडित मुलगा व त्याचा मित्र हे रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर गप्पा मारत बसले होते. काही वेळाने खुराना यांच्यासोबत इतर जण तिथे आले. तुम्ही आमच्या मुलीला का छेडता, असे विचारत या दोघांनाही लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांना नग्न करून रस्त्याने मारहाण करत धिंड काढली. या मारहाणीचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. मारहाणीचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलाच्या आईने तो पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ वारजे पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.