शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

एमडब्लूटीए, डेक्कन चार्जर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मंदार वाकणकर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मंदार वाकणकर टेनिस अकादमी (एमडब्लूटीए) व डेक्कन चार्जर्स या संघानी अनुक्रमे टेनिसनट्स रॉजर व सोलारिस आरपीटीए या संघांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आठवड्याच्या दर शनिवार व रविवार या दिवशी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवीण पांचाळ, सुमंत पॉल, आशिष मणियार, राजेश मंकणी, अजित सैल, मंदार वाकणकर, विवेक खडगे, श्याम पेडणेकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एमडब्लूटीए संघाने टेनिसनट्स रॉजर संघाचा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

दुसऱ्या सामन्यात डेक्कन चार्जर्स संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सोलारिस आरपीटीए संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून चिराग रुणवाल, माधव घाटे, अजय कामत, मदन गोखले, ऋषिकेश पाटसकर, मुकुंद जोशी, आशिष पुंगलिया, चिराग शहा यांनी अफलातून कामगिरी बजावली. स्पर्धेत उपांत्य फेरीत एमडब्लूटीए संघाचा सामना डेक्कन चार्जर्स संघाशी तर, दुसरा सामना फर्ग्युसन कॉलेज अ व टेनिस टायगर्स यांच्यात होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्यपूर्व फेरी :

एमडब्लूटीए वि.वि. टेनिसनट्स रॉजर २४-०९

१०० अधिक गट : प्रवीण पांचाळ-सुमंत पॉल वि.वि. अनिल कोठारी-रवी कोठारी ६-१,

९० अधिक गट : आशिष मणियार-राजेश मंकणी वि.वि. सुधीर पिसाळ-कन्नन राघवन ६-२,

खुला गट : अजित सैल-मंदार वाकणकर वि.वि. भूषण सरदेसाई-वेंकटेश आचार्य ६-३,

खुला गट : विवेक खडगे-श्याम पेडणेकर वि.वि. जॉय बॅनर्जी-नितीन सावंत ६-३,

डेक्कन चार्जर्स वि.वि. सोलारिस आरपीटीए २४-१२

१०० अधिक गट : चिराग रुणवाल-माधव घाटे वि.वि. हेमंत भोसले-जयंत पवार ६-४,

९० अधिक गट : अजय कामत-मदन गोखले वि.वि. रवींद्र कात्रे-संजीव घोलप ६-०,

खुला गट : ऋषिकेश पाटसकर-मुकुंद जोशी वि.वि. रवींद्र पांडे-अन्वित पाठक ६-४,

खुला गट : आशिष पुंगलिया-चिराग शहा वि.वि. जयंत पवार-नीरज आनंद ६-४,