शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत किरकोळ वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:08 IST

जेजुरी : बारमध्ये दारू पिताना मित्रांच्या बाचाबाचीतून एकाचा खून झाल्याची घटना जेजुरीत शनिवारी उघडकीस आली. पोलिसांनी रातोरात एका ...

जेजुरी : बारमध्ये दारू पिताना मित्रांच्या बाचाबाचीतून एकाचा खून झाल्याची घटना जेजुरीत शनिवारी उघडकीस आली. पोलिसांनी रातोरात एका आरोपीस अटक केली आहे तर दुसरा फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद मल्हारी दळवी (वय ४१) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अमर घोरपडे आणि निरंजन पवार असे आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेजुरीतील महाद्वार पथावर प्रसाद मल्हारी दळवी याचे केशकर्तनालय आहे. प्रसाद शुक्रवारी रात्री.९.३० वाजता दुकान बंद करून अमर घोरपडे, निरंजन पवार या मित्रांबरोबर येथील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिताना त्यांची बाचाबाची झाली. बार मधील इतरांनी त्यांचे भांडण सोडवले. मात्र, त्यानंतर १२ वाजता आरोपींनी प्रसाद याच्या घरी जाऊन वाद घातला. तेथून त्याला होळकर तलाव येथे घेऊन गेले. तेथे दळवी याच्या डोक्यात दगड घालून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिला. ही घटना जेजुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी बार मधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींची ओळख पटवली. घटनास्थळी जाऊन गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली तर स्थानिकांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढला. पोलिसांनी दोन्ही आरोपीना त्यांच्या घरून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यात निरंजन उर्फ गोट्या प्रदीप पवार याला अटक केली. तर दुसरा आरोपी अमर घोरपडे हा फरार झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.

फोटो मेल केला आहे मयत प्रसाद दळवी