शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

सुनेची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST

पिंपरी/ चाकण : मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्यालाच मारेकऱ्यांनी संपविले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी ...

पिंपरी/ चाकण : मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्यालाच मारेकऱ्यांनी संपविले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, परराज्यातील दोघा मारेकऱ्यांना चाकण पोलिसांनी अटक केली.

अविनाश बबन राठोड (रा. मोहखेड, जिंतूर परभणी), मोहम्मद वसीम जब्बार (मूळ रा. बालन बाजार, मुंगेर, बिहार), मोहम्मद शहजाद इस्लाम ऊर्फ छोटू (रा. हजरतगंज, खानकाह, मुंगेर बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. जब्बार आणि मोहम्मद यांना पोलिसांनी अटक केली आहे. खेड तालुक्यातील वराळे येथील पत्राशेडमध्ये विनायक भिकाजी पानमंद यांचा मृतदेह ३० नोव्हेंबर रोजी आढळला होता. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. तपास करताना मयत पानमंद याने मुलगा अजित याच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्यासाठी राठोड याला सुपारी दिली होती. उत्तरप्रदेशातून पिस्तूल आणण्यासाठी आणि खुनाचा मोबदला म्हणून १ लाख ३४ हजार रुपये दिले होते. पैसे दिल्यानंतर राठोडने खून न केल्याने पानमंद यांनी पैसे परत देण्याचा तगादा लावला. त्यामुळे राठोड याने पानमंद यांना खुनाचा कट रचण्याच्या बहाण्याने वराळे येथील पत्राशेडमध्ये बोलावले. पानमंद तेथे गेल्यानंतर इतर आरोपींनी त्यांचा हात धरला. त्यानंतर राठोडने कापडी बेल्टने पानमंद यांचा गळा आवळला. बेल्ट मध्येच तुटल्याने राठोडने हाताने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.