शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका खाईना भूखंडाचे श्रीखंड !

By admin | Updated: November 4, 2015 04:19 IST

मालकी महापालिकेची; मात्र त्याची कायदेशीर नोंदच नाही, असे शेकडो भूखंड शहराच्या मध्य भागापासून ते उपनगरांतही पडून आहेत. त्याचा बेकायदा वापर होत असूनही पालिका प्रशासन

पुणे : मालकी महापालिकेची; मात्र त्याची कायदेशीर नोंदच नाही, असे शेकडो भूखंड शहराच्या मध्य भागापासून ते उपनगरांतही पडून आहेत. त्याचा बेकायदा वापर होत असूनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यातील काही जागांचे परस्पर व्यवहारही होत आहेत.जागांसाठी एकीकडे प्रत्येक चौरस फुटाला काही हजार रुपयांचा दर सध्या सुरू असताना, महापालिकेने मात्र आपली अब्जावधी रुपये किमतीची करोडो चौरस फूट जमीन वाऱ्यावर सोडून दिली आहे. या पडून असलेल्या भूखंडांमध्ये उद्यान, रुग्णालय, सांस्कृतिक सभागृह अशा सार्वजनिक वापरांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांचाही समावेश आहे. असे अनेक भूखंड महापालिकेच्या ताब्यात आहेत; मात्र त्यांच्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावर मालक म्हणून पालिकेची नोंदच नाही. काही भूखंड कसे आले, कोणाकडून आले, याची माहिती नाही.अशा मालमत्ताची व्यवस्था पाहण्यासाठी पालिकेत ‘मालमत्ता व्यवस्थापन’ असा स्वतंत्र विभाग आहे. महापालिकेच्या मिळकतींची नोंद ठेवणे, त्याची कायदेशीर बाजू तपासून पाहणे, सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून महापालिकेची नोंद करून घेणे, ताब्यात आलेल्या मिळकतींच्या संरक्षणाची व्यवस्था करणे, रिकामा भूखंड असेल, तर त्यावर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे, आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करणे, त्याचा पाठपुरावा करणे, ही सर्व कामे मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडेच आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे उपायुक्त दर्जाचे पद व स्वतंत्र कर्मचारीही आहेत.असे असतानाही महापालिकेच्या अनेक भूखंडांवर अतिक्रमणे झालेली आहेत. पद्मावती येथे एका मोठ्या भूखंडावर खासगी प्रवासी वाहतूक कंपनीच्या गाड्या लावल्या जातात. त्या लावण्याचे पैसे त्या कंपनीकडून परस्पर एक जण वसूल करीत असतो. या भूखंडाचा एक मोठा भाग महापालिकेने उद्यानासाठी आरक्षित केला आहे. तो महापालिकेकडे हस्तांतरित केला गेला असला, तरी महापालिकेकडे नक्की किती व कोणते क्षेत्र हस्तांतरित झाले, याच्या नोंदीच नाहीत. त्यामुळे संबंधिताकडून सगळाच भूखंड वापरला जात आहे. घोरपडी पेठ येथेही एका मोठ्या भूखंडाचा असाच गैरवापर सुरू आहे. काही भूखंडावर झोपड्यांची अतिक्रमणे, तर काहींवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत.माहिती जमा करण्यात येत आहेनेमके किती भूखंड असे विनावापर किंवा कायदेशीर नाव नसलेले आहेत, त्याची माहिती जमा करण्यात येत आहे. फार पूर्वी झालेली काही प्रकरणे आहेत. आता सातबाऱ्यावर नाव लागल्याशिवाय जागा ताब्यात घेतलीच जात नाही; तसेच जागा ताब्यात घेतल्यानंतर, ती ज्यासाठी आरक्षित आहे त्या विभागाकडे हस्तांतरित केली जाते. - सतीश कुलकर्णीउपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापनसविस्तर माहितीही नाहीमहापालिकेचे किती भूखंड असे विनावापर पडून आहेत, याची सविस्तर माहितीही महापालिकेत नाही. मनुष्यबळ नाही, प्रकरण जुने आहे, कागदपत्रे पाहायला लागतील, नाव लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगितले जाते. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे अंदाज काढला, तर अब्जावधी रुपयांची मालमत्ता महापालिकने अशीच वाऱ्यावर सोडून दिली आहे. पालिका प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे. तो बऱ्याच वर्षांपासून असाच आहे. प्रत्येक अधिकारी प्रकरण जुने आहे, असेच सांगत असतो. ते मार्गी कधी लागणार, हे मात्र कोणीच सांगत नाही. हे सगळे भूखंड हातातून गेल्यानंतरच पालिकेला जाग येईल, असे दिसते.- आबा बागुलउपमहापौर