शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला मिळेना अ‍ॅमिनिटी स्पेस!

By admin | Updated: November 14, 2015 03:09 IST

बांधकाम व्यावसायिकाने मोठी जागा विकसित केल्यानंतर महापालिकेला द्यावयाच्या २४४ मोकळ्या जागा (अ‍ॅमिनिटी स्पेस) अनेक वर्षांपासून ताब्यात मिळाल्या नसल्याची माहिती

पुणे : बांधकाम व्यावसायिकाने मोठी जागा विकसित केल्यानंतर महापालिकेला द्यावयाच्या २४४ मोकळ्या जागा (अ‍ॅमिनिटी स्पेस) अनेक वर्षांपासून ताब्यात मिळाल्या नसल्याची माहिती उजेडात आली आहे. यामुळे शहरासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उभारण्यामध्ये अडचणी येत आहेत. अ‍ॅमिनिटी स्पेस ताब्यात मिळण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात आहे.बांधकाम व्यावसायिकाने ४० हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक जागेवर निवासी व व्यावसायिक बांधकाम केल्यास आवश्यक सुविधा उभारण्यासाठी त्या क्षेत्राच्या १५ टक्के जागा महापालिकेला देणे बंधनकारक आहे. औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या जागेवर बांधकाम केल्यास ५ टक्के जागा पालिकेला द्यावी लागते. गेल्या काही वर्षांत शहरामध्ये ७०६ अ‍ॅमिनिटी स्पेस उपलब्ध झाल्या. त्यांपैकी ४६२ जागा पालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. मात्र, उर्वरित २४४ जागांचा ताबा बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेला दिलेला नाही. नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना प्रशासनाने ही माहिती दिली आहे. अ‍ॅमिनिटी स्पेसच्या बदल्यास व्यावसायिकाला चटई निर्देशांक (एफएसआय) पालिकेकडून दिला जातो. या जागांवर पालिकेकडून उद्याने, दवाखाने, रस्ते, शाळा अशा सुविधा उभारल्या जातात. एका बांधकाम व्यावसायिकाने अ‍ॅमिनिटी स्पेसचा ताबा न दिल्याने त्याची सर्व बांधकामे थांबविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशावर प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही. (प्रतिनिधी)