शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार एनएमसीची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST

पुणे : महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणा-या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राच्या नॅशनल मेडिकल कमिशनची (एनएमसी) मान्यता लवकरच मिळेल. ...

पुणे : महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणा-या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राच्या नॅशनल मेडिकल कमिशनची (एनएमसी) मान्यता लवकरच मिळेल. ही मान्यता मिळण्याकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वास केंद्रिय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शिष्टमंडळाला दिले. मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातच प्रवेश देण्यास सुरुवात केली जाणार आहे.

या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा समावेश होता.

महापौर मोहोळ हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची संकल्पना मांडली होती. पालिकेने त्याकरिता निधी उपलब्ध दिला होता. पालिकेने महाविद्यालयाचा आराखडा तयार केला होता. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या आणि मान्यता मिळाल्या आहेत. तसेच आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. अंतिम मंजुरीसाठी फडणवीस यांच्या पुढाकाराने मोहोळ, बीडकर, रासने यांनी हर्षवर्धन यांची भेट घेऊन महाविद्यालयासंदर्भात चर्चा केली. तसेच मान्यतेसंदर्भात मदत करण्याची विनंती केली.

वैद्यकीय महाविद्यालयाबाबत झालेल्या तांत्रिक पूर्ततांची माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुरेश चंद्र शर्मा यांचीही भेट घेण्यात आली.

====

वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यातील शेवटचा टप्पा महत्वाचा आहे. विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेऊन चर्चा केली. शहराची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी हे महाविद्यालय मैलाचा दगड ठरणार आहे. सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आरोग्य मंत्र्यांकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे.

- मुरलीधर मोहोळ, महापौर