शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साठविण्यासाठी पालिकेचा पुढाकार

By admin | Updated: May 13, 2016 01:36 IST

शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत जात असल्याच्या पार्र्श्वभूमीवर महापालिकेच्या ७५ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

पुणे : शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत जात असल्याच्या पार्र्श्वभूमीवर महापालिकेच्या ७५ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च येणार असून, त्यातून भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत होणार आहे.या पार्श्वभूमीवर महापालिकेने रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेसाठी पुढाकार घेऊन नागरिकांपुढे आदर्श उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेच्या मालकीच्या ७५ इमारती शहरांमध्ये आहेत, त्या सर्व इमारतींवर ही यंत्रणा बसविली जाणार आहे. याकरिता १ कोटी ७५ लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी दिली. या वेळी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. शहरामध्ये मागील वर्षी सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने यंदा पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेत. शहराला गेल्या ८ महिन्यांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने त्यांनी बोअर घेतले आहेत. बोअरच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने जमिनीखालील पाण्याची पातळी वेगाने घटत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. >पाण्याचा वापर स्वच्छतागृहांसाठीअंदाजपत्रकामध्ये पालिकेच्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बसविणे आणि शहरात बोअरवेल करण्याच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. येत्या जून अखेरपर्यंत शहरात ७५ ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. इमारतींच्या छतावर पडणारे पाणी गोळा करणे, त्याचे शुद्धीकरण करणे, ते पाणी बोअरवेलमध्ये सोडण्यासाठी व्यवस्था करणे आदी कामे याअंतर्गत केली जाणार आहेत. बोअरवेलमध्ये पाणी सोडल्याने भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होऊन पाण्याची वाढ होणार आहे. या पाण्याचा वापर प्रामुख्याने महापालिकेच्या स्वच्छतागृहांमध्ये करण्यात येणार आहे.