शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

वळणदार अक्षरासाठी महापालिकेचे प्रयत्न

By admin | Updated: February 17, 2016 00:56 IST

मुलांना मोफत शालेय साहित्य, व्यक्तिमत्त्व, कला-क्रीडा विकास करणे, त्याचबरोबर गुणवंतांना भरघोस बक्षिसे देण्याबरोबरच हस्ताक्षर सुधारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे

विश्वास मोरे, पिंपरी-चिंचवडमुलांना मोफत शालेय साहित्य, व्यक्तिमत्त्व, कला-क्रीडा विकास करणे, त्याचबरोबर गुणवंतांना भरघोस बक्षिसे देण्याबरोबरच हस्ताक्षर सुधारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे. सुंदर हस्ताक्षरातून व्यक्तिमत्त्व अधिक खुलत असते. प्रभाव पडत असतो. त्यामुळे महापालिका शाळांतील मुलांचे हस्ताक्षर सुधारण्याचा आणि अक्षरवळण लावण्याचा प्रयत्न ‘हस्ताक्षर प्रकल्पा’तून केला जात आहे. हस्ताक्षर हा शिक्षणाचा पाया आहे. अक्षरावरून व्यक्तिमत्त्वाची छाप पडत असते. महापालिकेच्या शाळांमध्ये सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. शिक्षण मंडळांतर्गत प्राथमिक विभागाच्या १२१, तर माध्यमिक विभागाच्या १८ शाळा आहेत. त्यात एकूण ४० हजार ७७६ मुले शिक्षण घेत आहेत. हस्ताक्षर सुधार प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात इयत्ता पाचवी, सहावी, सातवीच्या वर्गांची निवड केली आहे. वर्षांतील दोन टप्प्यात हे प्रशिक्षण होते. पहिल्या चार महिन्यांत १४ आणि दुसऱ्या चार महिन्यांत २४ अशा एकूण २८ शाळांची निवड एका वर्षात केली जाते. प्रसिद्ध हस्ताक्षरतज्ज्ञ विजयकुमार मडजोडी यांच्या मार्गदर्शनाखाली किरण वत्स, शैला पाचपुते, गंगाबाई नरवडे, मनीषा दळवी, रोहिणी म्हाळस, मनीषा गायकवाड, पूजा वाकचौरे या प्रकल्पात काम करीत आहेत. या हस्ताक्षरतज्ज्ञांनी आजवर एकूण २५ हजार मुलांच्या अक्षरांना वळण लावले आहे. मुलांना अक्षर सुलेखनाची गोडी लावली आहे.शाळांतील वर्गांची निवड केल्यानंतर सुरुवातीला कटनिपच्या साह्याने मुळाक्षरे लिहिण्याचा सराव केला जातो. गाठीच्या सरळ वळणाच्या अक्षरांचा सराव करून घेतला जातो. त्याचबरोबर अक्षरसमूह, रेषांचे सरावही करून घेतले जातात. देवनागरी, रोमन आणि करसिव्ह रायटिंगचा सराव घेतला जातो. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी, संस्कृत, हिंदी अक्षरलेखनाचा सराव केला जातो. धडे लिहिणे, शुद्धलेखनाचे नियमही शिकविले जातात. शिक्षण मंडळ उपसभापती नाना शिवले म्हणाले, ‘‘संस्कारक्षम वयात अक्षरांचा संस्कार करण्याचा प्रयत्न हस्ताक्षर सुधार कार्यक्रमातून होत आहे. महापालिका शाळांतील मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. जीवनात हस्ताक्षराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडणार आहे. सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवायला हवा.’’ या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिका शाळाही स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुलेखनाचा संस्कार व्यक्तिमत्त्व विकासात सुलेखनाचे महत्त्व आहे. त्यामुळे हस्ताक्षर प्रकल्प अधिक शाळांमध्ये राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळेल. - चेतन घुले, सभापती, पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ