शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

परमवीर चक्र जवानांच्या पुतळ्यांसाठी महापालिका देणार ६० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

पुणे : घोरपडी येथील ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ची दुरुस्ती आणि परमवीर चक्र मिळविलेल्या जवानांचे अर्धपुतळे बसविण्यासाठीचा ५९ लाख ६७ ...

पुणे : घोरपडी येथील ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ची दुरुस्ती आणि परमवीर चक्र मिळविलेल्या जवानांचे अर्धपुतळे बसविण्यासाठीचा ५९ लाख ६७ रुपये खर्च महापालिकेने करण्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेल्या मोरवाडा जंक्शनजवळ लष्कराच्या वतीने नॅशनल वॉर मेमोरियल उभारण्यात आले आहे. या ठिकाणी लष्करातील शहीद सैनिक व अधिकारी यांचे स्मृतिस्तंभ आहेत. याच परिसरात संरक्षकविषयक म्युझियम, वॉरमेमोरियल, रणगाडे, युद्धामध्ये वापरलेली आयुधेही ठेवण्यात आली आहेत. २००६ मध्ये नॅशनल वॉर मेमोरियलचा पर्यटनस्थळामध्ये समावेश करण्यात आला. पीएमपीएमएलच्या पुणे दर्शन अंतर्गत या वॉरमेमोरियलला पर्यटक भेट देत असतात.

सध्या सदन कमांडच्या वतीने या नॅशनल वॉर मेमोरियलच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी फायबर मटेरियल वापरून परमवीर चक्र मिळविलेल्या २१ लष्करी अधिकाऱ्यांचे अर्धपुतळे, आरसीसी पिलर व वॉल तसेच लायटिंग, साउंड सिस्टिम व अन्य सुशोभीकरणाच्या कामांचे नियोजन आहे. या सर्व कामांसाठी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, महापालिकेने यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सदन कमांडच्या वतीने महापालिका आयुक्तांना करण्यात आले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी वर्गीकरणातून ५९ लाख ६७ हजार ४५१ रुपये नॅशनल वॉर मेमोरियलच्या नूतनीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्यास बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.