शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचे देणे पालिका देईनात!

By admin | Updated: May 15, 2014 04:53 IST

कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी पैसे नसल्याची नामुष्की ओढवलेल्या खिळखिळ्या पीएमपीकडे पालनकर्ते असलेल्या दोन्ही महापालिकांनी पाठ फिरविली आहे.

 वीरेंद्र विसाळ, पुणे - कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी पैसे नसल्याची नामुष्की ओढवलेल्या खिळखिळ्या पीएमपीकडे पालनकर्ते असलेल्या दोन्ही महापालिकांनी पाठ फिरविली आहे. महापालिकांकडून पीएमपीला सुमारे २२० कोटी रुपयांची येणी असून, ४ महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेने दुर्लक्ष केले आहे. दोन्ही महापालिकांचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्त पीएमपीवर संचालक असूनही ही येणी वसूल होत नसल्याने तोट्यात बुडालेली सार्वजनिक वाहतूक धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पीएमपीकडे पुरेसा निधी नसल्याने काचा, इंजिन आॅईल, स्टेअरिंग आॅईल, टायर, पत्रे असे स्पेअर पार्ट खरेदी करणे शक्य झालेले नाही. तसेच, कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर व्हावेत, याकरिता नियोजन करताना प्रशासनाच्या तोंडाला फेस येत आहे. परंतु, या परिस्थितीकडे संचालकांनी काणाडोळा केल्याचे दिसून येते. महापालिकेअंतर्गत असलेल्या १३ स्तरांतील नागरिकांना मोफत पास देण्यात येतात. त्याचे पुणे महापालिकेकडून सुमारे ६२ कोटी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुमारे ३८ कोटी रुपये येणे आहे. तर, पुणे पालिकेकडून विद्यार्थी पासचे मागील वर्षीचे सुमारे ३ कोटी रुपये येणे आहे. केंद्र शासनाने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत राज्यात ९ पालिकांच्या प्रकल्प प्रस्तावांना मान्यता दिली. त्यामध्ये महापालिकांनी परिवहन उपक्रमांतर्गत बसखरेदीवरील व्हॅट इत्यादी कर आणि परिवहन उपक्रमातील संचालनातील तुटी (आॅपरेशनल लॉसेस) यामुळे होणारा खर्च स्वत:च्या उत्पन्नातून भरून काढणे बंधनकारक केले आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने १८ फेब्रुवारी २०१४ रोजी शासन निर्णय काढला; परंतु तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेतर्फे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. (प्रतिनिधी)