शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला नको आमदार निधी

By admin | Updated: November 11, 2015 01:51 IST

आमदार निधीतून काम करण्याची तयारी दाखवल्यानंतरही पालिका प्रशासन त्याबाबतीत काही हालचालच करायला तयार नाही.

 पुणे: आमदार निधीतून काम करण्याची तयारी दाखवल्यानंतरही पालिका प्रशासन त्याबाबतीत काही हालचालच करायला तयार नाही. सलग सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेची झोळी एकतर पैशाने भरलेली असावी किंवा मग ती फाटकी तरी असावी, अशी भावना आमदार अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केली.विधान परिषदेचे आमदार असलेले गाडगीळ यांनाआपला निधी पुणे जिल्ह्यात कुठेही खर्च करता येतो, मात्र आपण राहात असलेल्या पुण्यात काहीतरी करावे, या हेतूने त्यांनी पालिकेकडे दोन चांगल्या कामांचे प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी दिले. त्यातील एक काम ओंकारेश्वर मंदिराजवळ दशक्रिया विधीसाठी घाटावर मंडप बांधण्याचे आहे. सध्या तिथे अशी काहीही व्यवस्था नसल्याने अशा विधीसाठी आलेल्या लोकांना उन्हातच थांबावे लागते. व्यवसायाने वास्तुविशारद असल्याने गाडगीळ यांना नदीपात्रात बांधकाम करण्यासाठी असलेल्या निर्बंधाची माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी या निर्बंधांची अडचण होणार नाही, अशा दृष्टिने स्वत: या नियोजित मंडपाचे आरेखन करून दिले. यासाठी आपला निधी वापरण्याचे लेखी पत्रही पालिका प्रशासनाला दिले. मात्र त्याला आता सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊन गेला तरीही प्रशासनाकडून अद्याप काहीही हालचाल झालेली नाही अशी त्यांची तक्रार आहे.स्मार्ट सिटी मध्ये गुंतलेल्या आयुक्तांना अशा लहान कामांमध्ये रस नसावा, आमदार निधीसाठी अनेकजण प्रयत्नशील असताना पालिकेचा हा सुस्तपणा अनाकलनीय आहे, असे मत गाडगीळ यांनी व्यक्त केले.