शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई कर्नाटकची कधीच नव्हती, सवदी सुधरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी करून मराठी-कन्नड वाद भडकाविणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी करून मराठी-कन्नड वाद भडकाविणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी मानसिकदृष्टयाच आजारी पडले आहेत. त्यांना ‘गेट वेल सून’ च्या शुभेच्छा देणारे पत्र आणि गुलाबपुष्प प्रवाशांमार्फत पाठविण्याचे अभिनव आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी (दि. २८) करण्यात आले.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर हे आंदोलन केले. कर्नाटकचे राजकारणी विनाकारण मराठा-कन्नड वाद भडकावित आहेत. सामान्यांचा त्यांना पाठिंबा नाही. त्यामुळे एसटी बसमधून कर्नाटककडे निघालेल्या प्रवाशांमार्फत सवदी यांच्यासाठी पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वात विनोद पवार, श्रीनिवास मेखला, नचिकेत साळवी, सचिन राजगुरु, गणेश विटकर, सागर पिलाने उपस्थित होते.

सवदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबईवर नजर टाकणारे वक्तव्य आपल्याकडून झाले यातच आपले बुद्धी दारिद्रय दिसले आहे. मुंबईला केंद्रशासीत राज्य करण्याच्या फंदात तुम्ही, तुमच्या कर्नाटक किंवा दिल्लीच्या भाजपने न पडलेलेच बरे. कराचीपासून कारवारपर्यंतचा संपूर्ण टापू ‘मुंबई प्रॉव्हिनन्स’ याच नावाने ओळखला जात होता. त्यामुळे कर्नाटकच ‘मुंबई’चा भाग होता. त्याही मागे जायचे तर आजच्या ‘विजयपुर’च्या आणि तेव्हाच्या विजापुरच्या आदिलशाहीला मराठ्यांनी जमीनदोस्त केले. जी आज तुमची राजधानी आहे, ते ‘बंगळुरू’ हे तर आमच्या छत्रपती शिवाजी राजांचे पिता शहाजी राजे यांची जहागिरी होती. आपला कच्चा इतिहास सुधारून घ्या.

चौकट

'कराची ते कारवार' टापू मुंबई प्रदेशात होता

कर्नाटकाकडे जाणाऱ्या एसटी बसवरही फलक लावले. 'मुंबई कर्नाटकची कधीच नव्हती; पण 'कराची ते कारवार' हा आख्खा टापू मुंबई प्रदेशात होता, हा इतिहास आहे. सुधरा सवदी’, ‘छत्रपती शहाजी राजांची राजधानी बंगळूरु होती, हा इतिहास विसरु नका’, ‘बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होणारच! अशा घोषणा त्यावर लिहिल्या होत्या.