शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

खासदार सुळे यांच्या पुढाकारातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:12 IST

बारामती : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ...

बारामती : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून आज पुण्यात दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा पार पडला.

मेळाव्यात सहभागी झालेल्या सुमारे पाचशे तरुण - तरुणींपैकी सहा जोडप्यांचे विवाह निश्चित झाले. आगामी काळात ही सर्व माहिती ऑनलाईन अपलोड करण्यात येणार असून, त्याद्वारे आज आलेल्या सर्व तरुण - तरुणींना माहिती पाठवण्यात येणार आहे. त्यायोगे आणखी जेवढे विवाह निश्चित होतील, त्या सर्वांचे विवाह येत्या डिसेंबर महिन्यात खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी १२ डिसेंबर रोजी बारामती येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह लावून देण्यात येणार आहेत. याचा संपूर्ण खर्च खासदार सुप्रिया सुळे या स्वत: करणार आहेत.

या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ समाजसेविका नसिमा हुर्जूक यांनी भेट दिली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समन्वयक म्हणून जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्राचे नंदकुमार फुले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर, अशोक सोळंके, दीपिका शेरखाने, सुकेशिणी मर्चंडे, विष्णू वैरागकर, बाळासाहेब जगताप, अमेय अग्रवाल, सागर कान्हेकर, दिव्यांग कार्यकर्ते भाग्यश्री मोरे, मिनीता पाटील, दत्तात्रय भोसले, अभय पवार आदींनी काम पाहिले. कान्हेकर यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले. शेरखाने आणि रमेश बागले यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या कर्णबधीर प्रतिनिधींसाठी तेजस्विनी तळगूळकर यांनी दुभाषक म्हणून काम पाहिले.

————————————————