शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यविक्रीला पाठिंबा देणाऱ्यांविरोधात आंदोलन

By admin | Updated: May 16, 2017 06:47 IST

सर्वोच्च न्यायालायाने राज्य व राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटर अंतराच्या आत मद्यविक्रीला केलेली बंदी हाणून पाडण्याच्या राज्य सरकारच्या व त्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्वोच्च न्यायालायाने राज्य व राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटर अंतराच्या आत मद्यविक्रीला केलेली बंदी हाणून पाडण्याच्या राज्य सरकारच्या व त्यांना मदत करणाऱ्या महापालिकेच्या विरोधात राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवसेनेने ही पुणेकरांची फसवूणक असल्याची टीका केली असून, काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी महापालिका प्रशासनाला असे काही करण्याचा अधिकाराच नसल्याचे म्हटले आहे. महापालिकेत भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या रिपाइंचे नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.शिवसेनेचे गटनेते संजय भोसले याबाबत म्हणाले, की पालिकेच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करून दारूची दुकाने सुरू करण्यास शिवसेनेचा विरोध आहे. राज्य सरकारने ही दारूची दुकाने सुरू केली, तर शिवसेना आंदोलन करेल. काँग्रेसचे नगरसेवक बागुल यांनी महापालिकेला असा पत्र पाठविण्याचा अधिकारच नाही, असे म्हटले आहे. सरकारने पाठवलेले पत्र नियमाप्रमाण आयुक्तांनी सर्वसाधारण सभेपुढे ठेवायला हवे. ही सभाच त्यावर निर्णय घेऊ शकते. सभेचा हा अधिकार डावलून आयुक्तांनी सरकारला परस्पर पत्र पाठवणे बेकायदेशीर आहे. काँग्रेस या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करेल, असेही बागुल म्हणाले.रिपाइंचे नगरसेवक डॉ. धेंडे यांनी तर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निर्णयाच्या विरोधात लेखी ठरावच दाखल केला आहे. वैद्यकीय व्यवसायात आतापर्यंत तपासलेल्या एकूण रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण अति मद्यसेवनानेच आजारी असल्याचे आढळले आहे. सर्वसमान्य कष्टकरी वर्गाला ग्रासणाऱ्या या दारूविक्रीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राज्य सरकार बदलत असेल तर हे सरकार कोणासाठी काम करते, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.