शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात येतात दिल्लीतून सर्वाधिक विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:38 IST

\Sलोकमत न्युज नेटवर्क पुणे : दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला असल्याने देशभरातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट गडद होत चालले ...

\Sलोकमत न्युज नेटवर्क

पुणे : दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला असल्याने देशभरातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट गडद होत चालले आहे. पुणे शहरातही रुग्णसंख्येत वाढ होण्याची भिती आहे. त्यातच सध्या पुण्यातून ये-जा करणाऱ्या विमानांमध्ये दिल्लीची विमाने सर्वाधिक आहेत. पुणे विमानतळावर शुक्रवारी एकुण ६६ विमानांची ये-जा झाली. त्यामध्ये सर्वाधिक २३ विमाने दिल्लीची होती. त्यामुळे ही सेवा काही काळ बंद ठेवण्याचा विचार होत आहे.

पुणे विमानतळावरून दिल्लीसह बेंगलुरू, कोलकाता, हैद्राबाद, चेन्नई, लखनऊ, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह १३ हून अधिक शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी विमानतळ रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुढील वर्षभर बंद राहणार असल्याने सध्या दररोज केवळ ६० ते ७० विमानांचीच ये-जा होत आहे. पण या विमानांमध्येही जवळपास २० हून अधिक विमाने दिल्लीला ये-जा करणारी आहेत. त्यापाठोपाठ बेंगलुरूसाठी ३ ते ५ तर अन्य शहरांसाठी जास्तीत जास्त २ ते ३ विमाने आहेत. रोजची प्रवासी संख्याही सध्या ७ ते ८ हजारांच्या जवळपास आहे. लॉकडाऊनपुर्वी हा आकडा २० हजारांच्या जवळपास होता.

महाराष्ट्रासह काही राज्यांनी दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. पुण्यातही दिल्लीतून दररोज २० हून अधिक विमानांची ये-जा सुरू आहे. त्यातून सुमारे अडीच ते तीन हजार प्रवासी पुण्यात येत आहेत.

----------

मागील महिन्याच्या मध्यापर्यंत बाहेरून पुण्यात येणाºया प्रवाशांना १४ दिवसांचे होम क्वारंटाईन व हातावर शिक्का बंधनकारक होता. पण आता हे बंधनही नाही. त्यामुळे दिल्लीसह अन्य शहरांतून येणारे प्रवासी सहजपणे शहरभर वावरू शकतात. तसेच संबंधित विमानतळांवरही आरोग्य सेतु अ‍ॅप, शरीराचे तापमान आणि मास्क पाहिले जाते.

-------------

दिल्लीतून ये-जा करणारी विमाने व प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. तसेच येणाºया प्रवाशांच्या तपासणीसाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली नाही.

- कुलदीप सिंग, संचालक, पुणे विमानतळ

-------------

मागील काही दिवसांत दिल्लीतून ये-जा केलेली विमाने

दिवस आलेली गेलेली

२१ नोव्हेंबर १० ९

२० नोव्हेंबर १२ ११

१९ नोव्हेंबर १२ ११

१८ नोव्हेंबर १२ ११

१७ नोव्हेंबर १२ १०

-----------------------------------