शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान!

By admin | Updated: September 30, 2015 01:09 IST

पुणे-नाशिक मार्गावर भोसरी ते नाशिक फाटा फिरावयास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातच भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल झाल्यापासून ही संख्या आणखीनच रोडावली आहे

नितीन शिंदे, भोसरीपुणे-नाशिक मार्गावर भोसरी ते नाशिक फाटा फिरावयास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातच भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल झाल्यापासून ही संख्या आणखीनच रोडावली आहे. पहाटेपासून या पुलावरून चालणाऱ्यांची गर्दी असते. रस्त्याच्या कडेला असणारे दिवे अनेक वेळा बंद असतात. पहाटेचा अंधार व रस्त्याने उलट्या दिशेने चालत जाणारे नागरिक यांमुळे वाहनचालकांची मोठी कसरत होत असून, पहाटेचा मॉर्निंग वॉक करताना एका महिलेच्या जिवावर बेतले असते. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने काही दुर्घटना घडली नाही. चार-पाच दिवसांपूर्वी पहाटे फिरायला जाणारी एक व्यक्ती बसला आडवी आली. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकावर घातली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शिवाय, या बसचालकाला मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकाने बस व्यवस्थित चालवायला येत नाही का, असे सुनावले. यामध्ये बसमध्ये असलेल्या एका महिलेला डोक्याला थोडा मार लागला. अपघाताचे गांभीर्य अपघातातील व्यक्ती आपल्याशी निगडित असेल, तरच कळत असते. या रस्त्याला दोन्ही बाजूला दिवे आहेत, मात्र ते सुरू नाहीत. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ नाहीत. हा मॉर्निंग वॉक जीवघेणा ठरू नये, याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. रस्त्याच्या उलट्या बाजूने जाण्याचे टाळणे गरजेचे आहे. सध्या पाऊस नसल्याने फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत फिरायला येत आहेत. भोसरीत सध्या फिरायला येणे ही एक फॅशन होऊन बसली आहे. व्यायाम करण्यास कोणाला विरोध असण्याचे काही कारण नाही. -----------४पहाटेच्या वेळी वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना जरा सावधान, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ४पुणे- नाशिक महामार्ग अत्यंत रहदारीचा म्हणून ओळखला जातो. त्यातच नाशिक फाटा ते भोसरी या दरम्यान वाहनांची जास्तच वर्दळ असते. पहाटेच्या वेळी फिरायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भोसरी उड्डाणपुलावर पहाटेच्या वेळी फिरायला जाणे, ही फॅशन झाली आहे. ४रात्रीच्या वेळेस व पहाटेपासून सकाळी सातपर्यंत राजमाता उड्डाणपुलावरून उलट्या बाजूने फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा भाग तसा निर्मनुष्यच. त्यामुळे संख्या वाढत आहे.