सोमेश्वरनगर : श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे पहील्या श्रवणी सोमवारी हरहर महादेवाच्या जयघोषात पावसाची रिमझीम ङोलत सुमारे 1 लाख भाविकांनी स्वयंभू लिंगाचे दर्शन घेतले.
रात्री बारा वाजता धर्मादाय आयुकताचे अधीक्षक तानाजी गायकवाड व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते पिंडीला महाअभिषेक घालण्यात आला. बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर व संजय देवकाते यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी सोमेश्वर चे संचालक रूपचंद शेंडकर, अरूण जगताप, सिद्धार्थ गिते,राहुल तांबे, देवस्थान चे अध्यक्ष रामदास भांडलकर, करंजेचे सरपंच प्रकाश मोकाशी, सचिव मोहन भांडवलकर, खजिनदार योगेश भांडवलकर आदी मान्यवर होते.
जगन्नाथ दोडमिसे व दत्तात्रय हाके या भाविकांच्या वतीने मंदिरात महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. या व्यतीरिकत स्वारगेट,फलटण,सासवड, बारामती येथील आगारांनी बसेस ची सोय करण्यात आली होती. दिवसभर होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने डॉ. मनोज खोमणो यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली. यावेळी स. पो. नि विलास भोसले व गजानन गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
4बाहेरगावावरून येणा:या भाविकांची भकत निवासात राहण्याची सोय करण्यात आली होती. आज विशेष करून मुंबईच्या कोळी समाजातील भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच सर्परूपी सोमनाथांनी दर्शन दिले होते. संदिप तुकाराम गायकवाड या भविकाच्या वतीने आजच्या अन्नदानाची सोय करण्यात
आली होती.