शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांमुळे शासनाची महिन्याला ३ कोटींची बचत

By admin | Updated: October 1, 2015 00:45 IST

पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल १ लाख ७ हजार १०० ग्राहकांनी आपली गॅस सिलिंडरची सबसिडी परत केली आहे. यामुळे केंद्र सरकारची दर महिन्याला तब्बल २ कोटी ९८ लाख रुपयांची बचत होत आहे.

सुषमा नेहरकर-शिंदे , पुणेपुणे जिल्ह्यामध्ये तब्बल १ लाख ७ हजार १०० ग्राहकांनी आपली गॅस सिलिंडरची सबसिडी परत केली आहे. यामुळे केंद्र सरकारची दर महिन्याला तब्बल २ कोटी ९८ लाख रुपयांची बचत होत आहे. आपले गॅस अनुदान नाकारण्यात महाराष्ट्रामध्ये पुणेकर सर्वांत आघाडीवर आहेत. गरजू लाभार्थींसाठीच्या या कल्याणकारी उपक्रमाबाबत ‘लोकमत’ने मोहीम सुरू करून, जिल्हा प्रशासनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गिव्ह इट अप’ या मोहिमेद्वारे देशातील श्रीमंत लोकांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे गॅस सिलिंडरचे अनुदान नाकारण्याचे आवाहन केले होते. या अनुदानाचे गरजू लाभार्थींना वाटप करण्यात येणार असून, देशाच्या विकासासाठी उपयोग करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. यासाठी सध्या सर्व गॅस कंपन्यांनी मिळून गॅस अनुदान परत करण्यासाठी ‘गिव्ह इट अप’ ही मोहीम हाती घेतली आहे. मोदी यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्या दरम्यान देशात सुमारे ३० लाख लोकांनी गॅस सबसिडी नाकारल्याचे सांगितले. जिल्ह्यात २४ लाख गॅस सिलिंडरचे ग्राहक असून, त्यापैकी आतापर्यंत १ लाख ७ हजार १०० ग्राहकांनी गॅस अनुदान घेण्यास नकार दिला आहे. यामध्ये सर्वांधिक ८९ हजार ग्राहक भारत गॅसचे, १३ हजार एचपी गॅस आणि ५ हजार १०० इंडियन आॅईल कंपनीचे आहेत. गॅस सिलिंडरची सबसिडी ‘गिव्ह अप’ करण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ‘आधी केले, मग सांगितले’चा प्रत्यय देत त्यांनी महसूल कर्मचाऱ्यांना यासाठी लेखी आवाहन केले. ‘लोकमत’च्या वतीने समाजातील विविध स्तरांतील नागरिकांना आवाहन करण्यात आले. सबसिडी ‘गिव्ह अप’ करणाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.