शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यात हवेलीत प्रति माणशी दहा किलो धान्याचे मोफत वाटप होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:11 IST

हवेलीमध्ये मोफत अन्न धान्याचे वाटप हे ८१ रास्तभाव दुकानातून होणार असून, मे व जून या महिन्यांसाठी हे वाटप असल्याची ...

हवेलीमध्ये मोफत अन्न धान्याचे वाटप हे ८१ रास्तभाव दुकानातून होणार असून, मे व जून या महिन्यांसाठी हे वाटप असल्याची माहिती हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.यावेळी तहसीलदार सुनील कोळी व अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, महसूल नायब तहसीलदार संजय भोसले उपस्थित होते.

सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन मे २०२१ मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा कार्डधारकास मोफत धान्य वाटप करणेबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केलेले आहे. यामधील पात्र लाभार्थ्यांना प्रति माणशी सहा किलो गहू व चार किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

मे २०२१ करिता मुख्यमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने‌ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २४८.८५० मेट्रिक टन गहू व १६६ मेट्रिक टन तांदूळ तसेच अंत्योदय योजने अंतर्गत ४९.५० क्विंटल गहू व १९.५० क्विंटल तांदूळ वाटपासाठी हवेली तालुक्यातील रास्तभाव दुकानदार यांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

मे व जून २०२१ करिता पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने‌ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार मे २०२१ करीता २४४ मेट्रिक टन गहू व १५२ मेट्रिक टन तांदूळ तसेच अंत्योदय योजने अंतर्गत २ मेट्रिक टन गहू व १ मेट्रिक टन तांदूळ इतके नियतन प्राप्त झाल्याची माहिती तालुका पुरवठा कार्यालयातून देण्यात आली.

--

कोट -१

हवेलीत अन्नसुरक्षेचे एकूण कार्ड संख्या १९ हजार असून अन्न सुरक्षा लाभार्थी संख्या ८४ हजार ६९४ आहे.२०० अंत्योदय कार्ड संख्या असून यामधील लाभार्थी संख्या ५७६ आहे.दुकानदारांना मोफत धान्य वाटपासाठी सूचना दिलेल्या आहेत दुकानांमधून धान्याचे वितरण सुलभ होणेसाठी मंडलाधिकारी,तलाठी, शिक्षक, स्थानिक ग्रामसुरक्षा दल यांनाही कळवले आहे. नागरिकांच्या धान्य वाटपाबाबत काही तक्रारी आलेस संबधित दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे सूतोवाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनीही सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून मोफत धान्य वाटपासाठी सहकार्य करावयाचे आहे.

संजय भोसले, महसूल नायब तहसीलदार