शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सून आला; पाऊस मात्र गायब

By admin | Updated: June 14, 2015 00:21 IST

पाच दिवस उशिरा दाखल झालेला मॉन्सून पुण्यात आता पाऊस पाडेल, अशी आशा घेऊन बसलेल्या पुणेकरांची मात्र आजही निराशा झाली.

पुणे : पाच दिवस उशिरा दाखल झालेला मॉन्सून पुण्यात आता पाऊस पाडेल, अशी आशा घेऊन बसलेल्या पुणेकरांची मात्र आजही निराशा झाली. आज दिवसभरात शहरात ढगाळ हवामान असूनही पाऊस मात्र पडलाच नाही. त्यामुळे पुण्यात मॉन्सून आला, पण पाऊस मात्र गायब अशी स्थिती झाली होती.यंदा पुण्यात मॉन्सूनपूर्व म्हणजेच वळवाच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. मॉन्सून पुण्यात दाखल होण्याअगोदर म्हणजेच १२ जूनअगोदर पुण्यात ८० मिमी पावसाची नोंद झाली होती. साधारणत: मॉन्सून ७ जूनला कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होतो आणि तो पहिल्याच टप्प्यात पुण्यातही येत असतो. मात्र यंदा मॉन्सूनला अनुकूल स्थिती नसल्याने तो ८ जूनला केवळ कोकणात दाखल झाला. त्यानंतर मात्र तब्बल ४ दिवसांनी तो पुण्यात दाखल झाला. काल मॉन्सून पुण्यात दाखल झाला, मात्र शहरात पाऊस पडला नाही. त्यामुळे आज तरी मॉन्सून पाऊस पाडेल, अशी आशा पुणेकरांना होती.